केरळमध्ये एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या करून आत्महत्या केली. सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी त्रास दिल्याचा आरोप आहे.

केरळमध्ये एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केली असून सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. तिने तिच्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या करून नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आईने मुलीच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मृत मुलीचा पती आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लग्नात कमी हुंडा दिल्याने झाला वाद लग्नात कमी हुंडा दिल्यामुळं वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. हुंडा कमी मिळाल्यामुळे सासरचे लोक विपंजीका मनीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होत्या. तिचे सौंदर्य कमी व्हावे म्हणून घरच्यांनी तिचे केस कापून टाकले. ती रंगाने गोरी होती आणि तिच्या घरचे रंगाने काळे होते. त्यामुळे त्यांनी तीच सौंदर्य खराब करण्याचा प्रयत्न केला.

मुलीला पाठवली घटस्फोटाची नोटीस 

मुलीला तिच्या सासरच्यांनी घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते, त्यावरून दोघांमध्ये कायमच वाद होत असायचे. याच वादाचे रूपांतर नंतर घटस्फोटात झाले. तिला मारहाण करण्यात आली होती असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. त्यामुळे पोलिसांनी सासरकडच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुलगी कोणत्या अवस्थेत होती ते माहित नाही, त्यामुळे सासरकडच्या लोकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. माझ्या मुलीला शांती मिळण्यासाठी दोषी आरोपींवर गुन्हा दाखल व्हायला हवा असं तिच्या आईने म्हटलं आहे. तिने फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली होती, त्याची माहिती पोलीस घेत आहेत. तिने सुसाईड नोटमध्ये सगळी माहिती दिली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय? - 

माझ्या सासऱ्यांनी माझ्यासोबत चुकीची वागणूक केली. मी ही गोष्ट माझ्या पतीला सांगितल्यावर त्याने यावर काहीच केले नाही. त्याने मी माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून तुझ्याशी लग्न केलं असं म्हटलं. तो काही व्हिडीओ पाहायचा आणि मलाही तेच व्हिडीओ दाखवायचा. मलाही बऱ्याचवेळा मारहाण केली. या लोकांना सोडू नका असं तीन लिहून ठेवलं आहे.