Ketan Agrawal Pune Case

Share this Video

Ketan Agrawal प्रकरणात त्यांचे वडील Vishal Agarwal, आई Rakhi Agarwal आणि आजोबा Devichand Agarwal यांनी अनेक गंभीर दावे केले आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यानंतर काही घटनांमुळे त्यांना संशय येऊ लागला होता. बाली ट्रिप रद्द होणे, पासपोर्ट गायब होण्याची घटना आणि लोहगडला जाण्याबाबत वारंवार आग्रह करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.तसेच कुटुंबीयांनी पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीचा उल्लेख करत या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. Ketan Agrawal हा शिक्षण आणि व्यवसायात अत्यंत हुशार असल्याचे सांगत कुटुंबीयांनी आपले दुःख व्यक्त केले. या प्रकरणी पोलिस तपास सुरू असून कुटुंबीयांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणीची मागणी केली आहे. कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि दावे हे त्यांच्या निवेदनावर आधारित आहेत.

Related Video