केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लोहगडावर अवघ्या ४५ मिनिटांत कट रचून केतनला दरीत ढकलून दिले. या घटनेनंतर, पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने दोघांनीही त्यांच्या मोबाईलमधील संभाषण आणि मेसेज डिलीट केले, ज्यामुळे प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर होत आहेत. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. १८ जूनला सिया आणि चेतन यांनी मिळून केतन अग्रवालचा खून केला. त्यांनी केतनचा खून हा ४५ मिनिटांमध्ये केला. केतन आणि सिया या दोघांचा पाठलाग करत चेतन त्यांच्या मागोमाग वर गेला. गडावर गेल्यावर सियाच्या इशाऱ्यावर त्यानं केतनला दरीत ढकलून दिलं.

किती वेळात केला खून?
केतन अग्रवालची हत्या ४५ मिनिटांमध्ये हत्या केली. केतन अग्रवाल, सिया गोयल आणि चेतन चौधरी हे तिघंही किल्यावर पोहचले होते. १०.४० वाजता सिया गोयलने केतन अग्रवालच्या आईला हि माहिती दिली. त्यानंतर १०.३० वाजता लोहगड किल्यावरील तिकीट खिडकीच्या सीसीटीव्हीत चेतन चौधरी दिसला. तो केतनला ढकलून पटकन गड उतरून गेला.
मोबाईलमधील मेसेज केले डिलीट
चेतन आणि सिया या दोघांची चॅट मोबाईलमधून डिलीट करण्यात आली. १८ जूनच्या घटनेनंतर तीन दिवसांनी पोलिसांनी तिला अटक केली. दरम्यानच्या काळात त्या दोघांमध्ये झालेले कॉल आणि मेसेज हिस्ट्री त्यांनी डिलीट केली. या दोघांच्या मोबाईलमध्ये शेकडो मेसेज असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. लॅबमधून फोन आल्यावर त्याची सत्यता समोर येण्याची शक्यता आहे.


