Pune Ketan Case । सियाचे वडाील म्हणाले, तर मुलीला ही शिक्षा द्या

Share this Video

केतन प्रकरणात सिया गोयलच्या वडिलांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर मोठं दुःख कोसळल्याचं त्यांनी सांगितलं. केतनला त्यांनी स्वतःच्या मुलासारखं मानलं होतं आणि त्याच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याचंही त्यांनी म्हटलं. सिया आणि केतन यांच्या लग्नाबाबत दोन्ही कुटुंबांमध्ये मोठ्या अपेक्षा होत्या, तसेच सियाने लग्नाबाबत कधीही नाराजी व्यक्त केली नव्हती, असा दावा त्यांनी केला. प्रेमसंबंध आणि इतर आरोपांबाबत माहिती नसल्याचं सांगत, तपासातून जो दोषी ठरेल त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.

Related Video