बीडमध्ये दोघांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या विलास घुले यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या प्रकरणी आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी घुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला.
बीडचं नाव आलं की खून किंवा मारामारी यांचंच नाव समोर येत असत. शनिवारी रात्री दोघांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या विलास घुले यांचा खून करण्यात आला. त्यांची पोटात चाकू खुपसून हत्या करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी केज न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आलं होतं. त्यांना न्यायालयाने ६ दिवसांची कोठडी सुनावली. आज धनंजय मुंडे यांनी घुले यांच्या घरी भेट दिली.

घुले यांच्या घरी धनंजय मुंडे यांनी दिली भेट
खून झालेल्या विलास घुले यांच्या घरी धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली आहे. आम्ही सामाजिक सलोखा जपून कोणाचंही मन दुखावलेलं नाही. यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलताना बीड जिल्ह्यातील एसपी सोडून बाकीच्यांना आडनाव लावण्याचा अधिकार नाही. आम्ही हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतलं आहे. या मुद्यावर मी सभागृहात बोललो आहे.
न्याय सर्वांना सारखाच असायला हवा
न्याय हा सर्वांना सारखाच असायला हवा असं यावेळी बोलताना धंनजय मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी मुंडे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. उपस्थित नागरिकांना यावेळी आपण न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास मुंडे यांनी दिला आहे. माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण तडीस नेणार असल्याचा विश्वास दिला.


