चीनच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, नव्याने पसरलेला व्हायरस न्यूमोनिया आजाराचाच आहे. यामध्ये कोणतेही दुसरे बॅक्टेरिया अथवा व्हायरसचा संसर्ग दिसून आलेले नाही.हैराण करणारी बाब म्हणजे सामान्य न्यूमोनिया आजाराच्या लक्षणाप्रमाणे लहान मुलांमध्ये कफची समस्या आढळत नाहीय.
त्यांच्या छातीच्या काढलेल्या एक्स-रे रिपोर्टमध्ये फुफ्फुसावर एक नोड्युल म्हणजेच गोलाकारात पॅच दिसत आहे. यास वैद्यकीय भाषेत पल्मोनरी नोड्युल (Pulmonary Nodules) असे म्हणतात. ही अवस्था बॅक्टेरियांच्या संसर्गात आल्यानेच निर्माण होते.
व्हायरल इन्फेक्शनमध्ये ही स्थिती आढळून येत नाही. डॉक्टर राम शंकर उपाध्याय यांच्या माहितीनुसार, आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांची स्थिती पाहिल्यास हे प्रकरण केवळ मायको प्लाझ्मा न्यूमोनियाचेच आहे, असे वाटत नाही. तर त्यांना एखादे व्हायरल इन्फेक्शनही झाले आहे. त्यांच्या आरोग्यावर एकाच वेळेस बॅक्टेरिया व व्हायरसचा हल्ला झाला आहे.