दररोज दहा हजार पाऊल चालल्यानंतर शरीराला काय फायदा होतो?
दररोज 10 हजार पाऊले चालण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी होणे, रक्ताभिसरण सुधारणे, ब्लड शुगर नियंत्रित राहणे आणि मानसिक आरोग्य सुधारणे यासारख्या फायद्यांचा यात समावेश आहे.
- FB
- TW
- Linkdin
)
दररोज दहा हजार पाऊल चालल्यानंतर शरीराला काय फायदा होतो?
दररोज १०,००० पावलं चालण्याचा शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होतो. ही एक सोपी, नैसर्गिक पण अत्यंत प्रभावी फिटनेस सवय आहे.
वजन कमी होण्यास मदत
नियमित चालण्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते व वजन संतुलित राहतं. रक्ताभिसरण सुधारतं, रक्तदाब नियंत्रित राहतो, हृदयरोगाचा धोका कमी होतो.
ब्लड शुगर नियंत्रित राहतो
मधुमेह असलेल्या व्यक्तींना यामुळे फायदा होतो. रोज चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, गॅस, बद्धकोष्ठता यावर नियंत्रण राहतं.
मानसिक आरोग्य चांगलं राहतं
चालल्यावर मेंदू Dopamine आणि Serotonin सारखे हॅप्पी हार्मोन्स तयार करतो, जे मानसिक तणाव कमी करतात. नियमित चालण्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
झोप सुधारते
थकवा आल्यानं झोप नीट लागते, आणि शरीराला विश्रांती मिळते. चालण्यामुळे फुफ्फुसं मजबूत होतात, श्वास घेण्याची क्षमता वाढते.
टिप
पहाटे किंवा संध्याकाळी चालणं जास्त फायदेशीर ठरतं. मोबाइलमध्ये स्टेप काउंटर अॅप वापरून प्रगती लक्षात ठेवा. हळूहळू सुरुवात करून १०,००० पावलं गाठा.