वजन वाढवण्यासाठी दररोज खा हे ड्रायफ्रुट्स
शरीराचे वजन वाढवण्यासाठी डाएटमध्ये काही पौष्टिक खाद्यपदार्थांसह सुकामेव्याचाही समावेश करा. कारण यातील पोषक घटकांमुळे शरीराचे वजन वाढण्यासह अन्य आरोग्यदायी फायदेही मिळतील.
अंजीरमध्ये कॉपर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यासारखे पोषकतत्त्वे आहे. जे शरीराच्या वजन वाढीस पोषक आहेत. वजन वाढवण्यासाठी सुके अंजीर पाण्यात भिजवून खावे.
शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज् आणि फॅट्सचे प्रमाण अधिक असते. झटपट वजन वाढवण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार डाएटमध्ये शेंगदाण्यांचा समावेश करावा.
मनुक्यांमध्ये कॉपर, मॅग्नीज, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन यासारख्या पोषकघटकांचा समावेश आहे. हे घटक शरीराच्या वजन वाढीसाठी पोषक आहेत. याव्यतिरिक्त शरीराला ऊर्जाही मिळते.
बदामामध्ये कॅलरीज्, प्रोटीन, फायबर, फॅट्स असल्याने शरीराचे वजन वाढण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त त्वचा-केसांशी संबंधित समस्याही कमी होतील.
पिस्तामध्ये फॅट, व्हिटॅमिन बी-6 व कॅलरीज् अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराचे वजन वाढू शकते. पिस्ता पाण्यात भिजवून खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
अक्रोडच्या सेवनामुळे वजनासह शरीराची उंचीही वाढते, असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होऊन उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते.
खजूरमध्ये वजन वाढीसाठी पोषक असणाऱ्या लोह-व्हिटॅमिन बी 6 या पोषणतत्त्वांचा साठा आहे. यातील फ्लेवोनोइड्स-फेनोलिक अॅसिडमुळे डोळ्यांपासून ते अल्जाइमजरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.