Marathi

झोपेतून उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही?

सकाळी उठल्यानंतर जर आपणास ताजेतवाने वाटण्याऐवजी आळस येत असेल तर यावर उपाय म्हणून डाएटमध्ये काही एनर्जी ड्रिंक्सचा समावेश करावा.

Marathi

आळस दूर करायचाय?

एनर्जी ड्रिंक्स प्यायल्यास शरीरातील आळस दूर होण्यास मदत मिळू शकते. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credits: Getty
Marathi

सफरचंदाचा ज्युस

सफरचंदमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, प्रोटीन, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, झिंक यासारखे गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा होतो.

Image credits: Getty
Marathi

लेमन मिंट ड्रिंक

लेमन मिंट ड्रिंक प्यायल्यास शरीरातील आळस दूर होण्यास मदत मिळेल. याव्यतिरिक्त शारीरिक तणाव देखील दूर होण्यास मदत मिळेल. एकूणच तुमचा मूड फ्रेश होईल.

Image credits: Getty
Marathi

केळ्याचे मिल्क शेक

केळ्यामध्ये पोटॅशिअमसारख्या कित्येक खनिजांचा साठा आहे. सकाळी केळ्याचे सेवन केल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहील. केळे, दूध आणि सुकामेवा एकत्रित मिक्स करून मिल्क शेक तयार करा.

Image credits: Getty
Marathi

नारळाचे पाणी

नारळाचे पाणी प्यायल्यास शरीराला अँटी-ऑक्सिडंट्स, अमिनो अ‍ॅसिड, व्हिटॅमिन सी यासारख्या पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. ज्यामुळे आळस दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळेल. 

Image credits: Getty
Marathi

हर्बल टी

हर्बल टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप असते. हे पेय प्यायल्यास वारंवार आळस येण्याची समस्या कमी होईल.

Image credits: Getty
Marathi

हर्बल टी कशी तयार करावी?

घरच्या घरी हर्बल टी तयार करण्यासाठी गरम पाण्यामध्ये आले, हळद आणि वेलचीची पूड मिक्स करा. चहा उकळू द्यावा. सकाळच्या वेळेस हा चहा प्यायल्यास शरीरास खूप फायदे मिळतील.

Image credits: Getty
Marathi

डाळिंबाचा ज्युस

डाळिंबाचा ज्युस प्यायल्यास शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यात मदत मिळेल आणि यामुळे आळसही दूर होईल. डाळिंबामध्ये 'व्हिटॅमिन सी', 'व्हिटॅमिन ई' आणि 'व्हिटॅमिन के'चे प्रमाण खूप असते.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

महिनाभर अंडी टिकवून ठेवायची आहेत? जाणून घ्या सोप्या टिप्स

सई ताम्हणकरचे हॉट फोटोशूट, एकापेक्षा एक सुंदर आहेत डिझाइनर ड्रेस

लाल तांदळाचा डाएटमध्ये करा समावेश, मिळतील जबरदस्त फायदे

Diwali 2023 : कांजीवरम साडीवर येथे मिळतोय 90 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट