सार

Javeria Khanum : सीमा आणि सचिनच्या प्रेमकहाणीचे प्रकरण ताजे असतानाच आता अशाच आणखी एका जोडप्याची कहाणी समोर आली आहे. ही पाकिस्तानी तरुणी लवकरच आपल्या भारतीय प्रियकराशी लग्न करणार आहे.

 

Javeria Khanum : प्रेम कोणत्याही प्रकारच्या सीमा पाहत नाही, भावना खऱ्या असतील तर प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांसाठी काहीही करायला तयार होतात. अशा कित्येक प्रेमकथा आपण छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर पाहिल्या असतील. 

काही महिन्यांपूर्वी सीमा हैदर नावाची पाकिस्तानी महिलेनं देखील आपल्या देशात घुसखोरी केली होती. इतकेच नव्हे तर सचिन मीना नावाच्या तरुणासोबत तिने लग्नही केले. वेगवेगळ्या कारणांमुळे हे जोडपे सतत चर्चेत असतानाच आता असेच काहीसे पण नव्या जोडप्याचे प्रकरण समोर आले आहे. 

पाकिस्तानमधील आणखी एक महिला सीमा ओलांडून भारतात आली आहे (Pakistani Woman Javeria Khanum Arrived In India) आणि भारतातील तिचा प्रियकर समीर खानसोबत (Javeria Khanum And Sameer Khan Love Story) तिला लग्नगाठ बांधायची आहे.

समीर खान - जवेरियाची प्रेम कहाणी

पाकिस्तानी महिला जवेरिया खानम हिला कोलकातामधील रहिवासी असलेल्या समीर खानसोबत विवाह करायचा आहे. जवेरिया खानमला आपल्या सरकारकडून 45 दिवसांचा व्हिसा मिळाला आहे. भारताच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर तिचे ढोलताशे वाजवून स्वागत करण्यात आले. भारतात आल्यानंतर जवेरिया खानमने प्रतिक्रिया दिली की,“अखेर 45 दिवस येथे राहण्याची परवानगी मिळाली. यासाठी मी खूप खूश आहे आणि मला येथे राहण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल भारत सरकारचे धन्यवाद”.

जवेरिया व समीर 5 वर्षांपासून आहेत रिलेशनशिपमध्ये

कोलकातामधील रहिवासी असणारा समीर खान आणि जवेरिया खानम (Javeria Khanum And Sameer Khan News) गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण दोघे एकमेकांना भेटू शकत नव्हते. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघं एकमेकांच्या संपर्कात राहत होते. भेट व्हावी यासाठी दोघंही वारंवार व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करत होते. अखेर भारत सरकारने जवेरिया खानमचा व्हिसा देत 45 दिवस देशात राहण्याची परवानगी दिली.

सीमा आणि सचिनची प्रेमकथा

यापूर्वीही पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमसंबंधाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती. सीमा हैदर चार मुलांची आई आहे. पण सचिन मीना नावाच्या तरुणाच्या प्रेमात ती आकंठ बुडाली आणि सचिनसाठी अवैधरित्या आपल्या देशात प्रवेश केला. भारतात घुसखोरी केल्यानंतर ती सचिन मीनासोबत नोएडा येथे राहू लागली. 4 जुलै 2023 रोजी सीमा हैदरला अटकही करण्यात आली होती. तसेच बेकायदेशीर स्थलांतरितांना आश्रय दिल्याबद्दल सचिनलाही तुरुंगात टाकण्यात आले होते. सध्या दोघंही एकमेकांसोबत राहत आहेत.

आणखी वाचा 

Video: जन्मत: हात नाहीत, उत्तमरित्या पायाने चालवते कार; केरळच्या तरुणीची प्रेरणादायी कथा

Global Technology Summit 2023: युद्धात गेम चेंजरची भूमिका निभावतेय तंत्रज्ञान - राजनाथ सिंह

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नव्या महामारीचा धोका वाढतोय, महाराष्ट्रासह या राज्यांतही अ‍ॅलर्ट जारी