सार

Viral Video: ‘माय गोल्डन किड्स’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये चार वर्षांचा मुलगा आपल्या पालकांच्या वागणुकीबद्दल सांगताना रडतो. “आईला मी आवडत नाही, बाबाही व्यवस्थितीत बोलत नाही”,  मनातील अशा भावनाही चिमुकल्याने बोलून दाखवल्या. 

My Golden Kids Show Video: प्रत्येक आईवडिलांना आपले बाळ प्रिय असते. पालक आपल्या लेकराची खूप काळजी घेतात, आनंदाने वाढवतात. पण एक चार वर्षांचा मुलगा आपल्या पालकांच्या वागणुकीमुळे त्रस्त असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ साऊथ कोरियन रिअ‍ॅलिटी शो 'माय गोल्डन किड्स' मधील आहे. एका चार वर्षांच्या मुलाने आपल्या आईवडिलांबद्दल ज्या काही भावना व्यक्त केल्या आहेत, त्यावरून तुमच्याही डोळ्यांमध्ये अश्रू येतील.

मुलाने रिअ‍ॅलिटी शोदरम्यान असे म्हटले की, “आईला मी आवडत नाही, बाबाही मोठ्याने बोलतात”. चिमुकल्याचे हे म्हणणं ऐकून कोणाचेही मन भरून येईल. 21 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या रिअ‍ॅलिटी शोचा हा एपिसोड तुफान व्हायरल होत आहे.

ग्यूम जी-यून (Geum Ji-Eun) असे मुलाचे नाव असून तो म्हणतो, "माझे आईबाबा माझ्याशी खेळत नाहीत, व्यवस्थितीत बोलतही नाहीत." असे बोलून तो रडू लागतो. ग्यूम जी-यूनच्या या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रेक्षकांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. माय गोल्डन किड्स (My Golden Kids) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झालेले पालक तज्ज्ञमंडळींना पालकत्वासंदर्भातील महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घेतात.

चिमुकल्याचा भावूक करणार व्हिडीओ 
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ग्यूम जी-यून असे म्हणतो की, आई-वडील सतत कामात असतात आणि थकतात. यामुळे त्याच्यासोबत दोघांपैकी कोणीही खेळत नाही. पुढे तो असेही म्हणाला की, "बाबांनी माझ्यासोबत प्रेमाने बोलावे. कारण मला त्यांच्या रागाची भीती वाटते." ग्यूमला आईबद्दलही विचारले तेव्हा आधी तो शांत झाला आणि थोडा वेळ थांबून म्हणाला, “कदाचित आईला मी आवडत नाही, असे मला वाटते”.

"मला शाळेत जायचे आहे"
या एपिसोडच्या दुसऱ्या क्लिपमध्ये ग्यूम असे म्हणतो की, "मला आर्ट स्कूलमध्ये जायचे आहे. पण माझ्या आईने मला म्हटले, तू चांगला दिसत नाहीस." त्याचे हे बोलणे ऐकून युजर्सनी पालकांविरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. तसेच पालकांनी दाखवलेल्या या निष्काळजीपणाबाबतही आश्चर्य व्यक्त केले. 

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ग्यू याचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत 10.4 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. दरम्यान, हा शो संपल्यानंतर ग्यूम जी-यू याची आईने त्याला जवळ घेतले आणि त्याच्यासोबत वेळ घालवला. आता ग्यूमची आई त्यासोबत खेळते आणि बाबाही त्याच्याशी व्यवस्थितीत वागतात.

आणखी वाचा: 

North Korea : किम जोंग उन यांना अश्रू अनावर, देशातील महिलांना केली ही विनंती! पाहा VIDEO

China Pneumonia Outbreak : चीनमध्ये फैलावतोय नवा गंभीर VIRUS, भारतावर होणार परिणाम?

मला मारू नका प्लीज! हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तरुणीचं केलं अपहरण, धक्कादायक VIDEO VIRAL