BLA Releases Photos of Gen Z Female Suicide Bombers : या 'Gen Z' पिढीच्या महिला आत्मघाती हल्लेखोर BLA च्या मजीद ब्रिगेडचा भाग असल्याची माहिती समोर येत आहे.

BLA Releases Photos of Gen Z Female Suicide Bombers : गेल्या दहा वर्षांतील पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या महिला आत्मघाती हल्लेखोरांचे फोटो बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) प्रसिद्ध केले आहेत. शनिवारी बलुचिस्तानमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुमारे 120 जण ठार झाले. या हल्ल्यात महिला आत्मघाती हल्लेखोरांचा सहभाग असल्याचे BLA ने आधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर आता या महिलांचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये 24 वर्षीय आसिफा मेंगल या तरुणीची ओळख पटली आहे. सुमारे 140 दहशतवाद्यांविरोधात पाक सुरक्षा दलांनी 40 तास चकमक केल्याची माहिती बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी रविवारी दिली.

 आसिफा मेंगल ही बलुचिस्तानची रहिवासी असून बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. तिचा जन्म 2 ऑक्टोबर 2002 रोजी झाला होता. ती BLA च्या मजीद ब्रिगेडचा भाग होती. शनिवारी झालेला हल्ला हा गेल्या काही दशकांतील पाकिस्तानमधील सर्वात घातक आत्मघाती हल्ला होता. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, बलूच घुसखोरांनी सामान्य नागरिकांना लक्ष्य केले.

Scroll to load tweet…

तुरुंग, पोलीस स्टेशन आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करून हल्ला

अतिसुरक्षित तुरुंग, पोलीस स्टेशन आणि निमलष्करी सुरक्षा यंत्रणांचे या हल्ल्यांमध्ये मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात 15 सुरक्षा कर्मचारी आणि 92 हल्लेखोर ठार झाले आहेत. हल्ल्यादरम्यान काही बँका लुटण्यात आल्या. हल्लेखोरांनी अनेक वाहने जाळली. बलुचिस्तान प्रांतातील अनेक ठिकाणी एकाच वेळी हे हल्ले झाले. हल्ल्यानंतर या भागातील पाकिस्तान रेल्वेची सेवा थांबवण्यात आली आहे. 

Scroll to load tweet…

BLA ने रेल्वे ट्रॅक उखडले आणि तुरुंगावर हल्ला करून कैद्यांची सुटका केली. क्वेटा, मस्तंग, नुश्की, गद्दार, पस्नी यासह अनेक ठिकाणी हल्ले झाले. गद्दार आणि पस्नी येथे दहशतवाद्यांनी बस थांबवून सामान्य नागरिकांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. नुश्की येथील निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. मस्तंगमध्ये अतिसुरक्षित तुरुंगावर हल्ला करून दहशतवाद्यांनी 30 हून अधिक कैद्यांची सुटका केली आहे.