Israel-Hamas War : नागीण फेम अभिनेत्रीच्या बहीण-भावोजीची हमासच्या दहशतवाद्यांनी केली निर्घृण हत्या,मुलांसमोरच घेतला जीव

| Published : Oct 11 2023, 11:25 AM IST / Updated: Dec 26 2023, 12:43 PM IST

 Israel-Hamas War
Israel-Hamas War : नागीण फेम अभिनेत्रीच्या बहीण-भावोजीची हमासच्या दहशतवाद्यांनी केली निर्घृण हत्या,मुलांसमोरच घेतला जीव
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Naagin actress's Sister And Her Husband Killed In Israel : अभिनेत्री मधुरा नाईकनं आपल्या बहीण आणि भावोजीचा फोटो शेअर करत हमासच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Israel-Hamas War : इस्रायल-हमासच्या भीषण युद्धादरम्यान (Israel Hamas War News) टेलिव्हिजन अभिनेत्री मधुरा नाईकच्या (Madhur Naik) जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धक्कादायक माहिती शेअर केली आहे.

मधुराने इंस्टाग्राम अकाउंटवर आपली चुलत बहीण आणि भावोजीचा फोट शेअर करत हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मुलांसमोर आईवडिलांची केली हत्या

मधुरा नाईकने (Naagin actress Madhura Naik sister and her husband killed in Israel) आपली चुलत बहीण, भावोजी आणि त्यांच्या दोन मुलांच्या फोटोसहीत सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.  

हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे या मुलांसमोरच त्यांच्या आईवडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही वेदनादायक घटना कधीही विसरता येणार नाही, अशा शब्दांत मधुराने आपले दुःख व्यक्त केले आहे. तिनं केलेल्या या पोस्टवर सह-कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

View post on Instagram
 

इस्रायल-हमासमध्ये भीषणमध्ये युद्ध

7 ऑक्टोबरपासून इस्रायल- हमासमध्ये भीषण युद्ध (Israel-Hamas War updates) सुरू आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला (Israel Terror Attack) केल्यानंतर या युद्धास सुरुवात झाली. यात आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावलाय तर कित्येक जण गंभीर स्वरुपात जखमी देखील झाले आहेत. 

अंगावर काटा आणणारे, अस्वस्थ करणारे युद्धाचे फोटो- व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताहेत.

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तरुणीचं केले अपहरण

हमासच्या दहशतवाद्यांनी (Israel Hamas war news in marathi) एका 25 वर्षीय तरुणीचे (Hamas kidnapped Israelis 25 year old woman) अपहरण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तरुणी दहशतवाद्यांकडे आपल्या जीवाची अक्षरशः भीक मागताना दिसत होती. 

अपहरण केलेल्या तरुणीचं नाव नोआ असे असल्याचे म्हटलं जात आहे. नोआला जबरदस्तीने बाईकवर बसवून दहशतवादी तिचं अपहरण करत असल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलमधील एका संगीत महोत्सवामध्ये (Peace Music Festival) नोआने आपल्या मित्रासोबत हजेरी लावली होती. यावेळेस हमासच्या दहशतवाद्यांनी येथे हल्ला केल्याचे म्हटलं जात आहे.

आणखी वाचा :

मला मारू नका प्लीज! हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तरुणीचं केलं अपहरण, धक्कादायक VIDEO VIRAL

इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?

Israel Vs Hamas : इस्रायल की हमास, सर्वात शक्तिशाली कोण? जाणून घ्या सविस्तर