मला मारू नका प्लीज! हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तरुणीचं केलं अपहरण, धक्कादायक VIDEO VIRAL

| Published : Oct 09 2023, 01:40 PM IST / Updated: Dec 26 2023, 12:41 PM IST

Hamas terrorists kidnapped 25 year old woman
मला मारू नका प्लीज! हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तरुणीचं केलं अपहरण, धक्कादायक VIDEO VIRAL
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे (Israel Hamas war News) फोटो - व्हिडीओ अंगावर काटा आणणारे आहेत. याचदरम्यान हमासच्या दहशतवाद्यांकडून इस्रायलच्या तरुणीचं अपहरण केल्याचा व्हिडीओ (Israel Hamas War Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Israel-Hamas war News : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू (Israel Hamas War News) असलेल्या युद्धाचे धक्कादायक फोटो - व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हमासच्या (Israel Hamas War Updates) दहशतवाद्यांचे कुकृत्य अक्षरशः अस्वस्थ करणारे आहेत. आईवडिलांसमोरच मुलीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता हमासच्या दहशतवाद्यांनी एका 25 वर्षीय तरुणीचे (Hamas kidnapped Israelis 25 year old woman) अपहरण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मला मारू नका प्लीज! जीव वाचवण्यासाठी तरुणीचा आटापिटा

नोआ असे या तरुणीचे नाव असल्याचे म्हटलं जात आहे. नोआला जबरदस्तीने बाईकवर बसवून दहशतवादी तिचं अपहरण करत असल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यावेळी नोआ या दहशतवाद्यांकडून आपल्या जीवाची अक्षरशः भीक मागताना दिसतेय. ‘मला मारू नका प्लीज!’ ही तरुणी अशी विनंती दहशतवाद्यांसमोर करत होती.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, नोआचा मित्र एव्ही नाथनलाही पकडून दहशतवादी कुठेतरी नेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिचाही मित्रही सध्या बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलमधील एका संगीत महोत्सवामध्ये (Peace Music Festival) नोआने आपल्या मित्रासोबत हजेरी लावली होती. यावेळेस हमासच्या दहशतवाद्यांनी येथे हल्ला केल्याचे म्हटलं जात आहे.

तरुणीच्या अपहरणाचा व्हिडीओ (Hams Terrorists Kidnapped Woman)

नोआचा मित्रही बेपत्ता

रिपोर्ट्सनुसार, एव्ही नाथन बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ मोशे यांनी नोंदवली आहे. नोआ व नाथनच्या अपहरणाबद्दलची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी देण्यात आली आहे. आपत्कालीन पथकांनी या दोघांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघांचाही मोबाइल संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे.

(Venice Bus Accident : पर्यटकांनी भरलेली बस रेलिंग तोडून कोसळली रेल्वे ट्रॅकवर, 21 जणांचा मृत्यू)

शेकडो लोक बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, नोआला पर्यटनाची खूप आवडत आहे. नुकतीच ती श्रीलंकेच्या दौऱ्याहून परतली होती. आपल्या एकुलत्या एक लेकीचं दहशतवाद्यांनी अपहरण (Hamas kidnapping Israelis girl) केल्याने तिच्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसला आहे. हे दुःखही व्यक्त करणं त्यांना कठीण जात आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हमासच्या दहशतवाद्यांनी (Israel Hamas war live news) हल्ला केल्याचे कळताच इस्रायलमधील संगीत महोत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांनी येथून पळ काढून आपला जीव वाचण्याचा प्रयत्न केला. पण शेकडो नागरिक बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे. 

आणखी वाचा

Venice Bus Accident : पर्यटकांनी भरलेली बस रेलिंग तोडून कोसळली रेल्वे ट्रॅकवर, 21 जणांचा मृत्यू

Israel Vs Hamas : इस्रायल की हमास, सर्वात शक्तिशाली कोण? जाणून घ्या सविस्तर

इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?