सार

China Pneumonia Outbreak : चीनमध्ये न्यूमोनिया आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण सूचना जारी करून सर्व जिल्ह्यांतील रुग्णालये व महानगरपालिकांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत.

Pneumonia Outbreak In China : चीनमधील लहान मुलांमध्ये श्वसनाशी संबंधित आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Maharashtra Issues Advisory) खबरदारी बाळगण्यासाठी बुधवारी (29 नोव्हेंबर) सर्व जिल्ह्यांतील रुग्णालये आणि महानगरपालिकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.

रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर आणि अन्य मूलभूत सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवाव्यात; असे जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. चीनमध्ये न्यूमोनिया, श्‍वसनाशी संबंधित आजाराची झपाट्याने पसरणारी साथ पाहता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्य सरकारचा आरोग्यविषयक सल्ला

राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर (Dr Pratap Singh Sarnikar) यांनी सांगितले की, राज्यात (Maharashtra Public Health Department) जारी करण्यात आलेल्या आरोग्यविषयक सल्ले हे केंद्र सरकारद्वारे (Union Health Ministry) लागू केलेल्या सूचनांचे पालन करतात. 

ज्यामध्ये आरोग्य विभागाला तयारीचा आढावा घेण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. यानुसार जिल्हा व महानगरपालिका रुग्णालयांना सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर इन्फ्लूएंझा  व हिवाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरजही व्यक्त केली गेली आहे.

आतापर्यंत या राज्यांत सूचना जारी

चीनमध्ये श्वसनाशी संबंधित आजाराची वेगाने पसरणारी साथ पाहता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आतापर्यंत सहा राज्यांमध्ये अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान टाळण्यासाठी राज्यांतील आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक, हरियाणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. 

नागरिकांना आरोग्यविषयक सतर्क ठेवण्यासोबतच आरोग्य सेवा सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जाताहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशा प्रमाणात आरोग्य व्यवस्था उभारण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे.

13 हजारांहून अधिक लहान मुलांना झालाय संसर्ग

रिपोर्टमधील माहितीनुसार, 21 नोव्हेंबर रोजी चीनमधील लहान मुले न्यूमोनिया आजाराला बळी पडल्याची माहिती देण्यात आली. यानंतर शनिवारी (25 नोव्हेंबर) तियानजिन परिसरातील मुलांसाठी असलेल्या सर्वात मोठ्या रुग्णालयात 13 हजारहून अधिक मुलांना संसर्ग झाल्याची नोंद करण्यात आली. वर्षभरापूर्वी कोरोना व्हायरसशी संबंधित निर्बंध शिथिल केल्यानंतर बीजिंग आणि उत्तर चीनमधील रुग्णालयांमध्ये आता लहान मुलांमध्ये श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ दिसून येत आहे. यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा

China Pneumonia Outbreak : चीनमध्ये फैलावतोय नवा गंभीर VIRUS, भारतावर होणार परिणाम?

Uttarkashi Tunnel Rescue : 17 दिवस 41 कामगार फिट राहण्यामागील सीक्रेट

इन्फ्लूएंझा किंवा सीझनल फ्लूची लक्षणे आढळल्यास काय करावे व काय करू नये?