सार

अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी नागरिकांना H-1B व्हिसा जारी केला जातो. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अखेरची तारीख 22 मार्च आहे.

US :  अमेरिकेच्या H-1B व्हिसाचे रजिस्ट्रेशन लवकरच बंद होणार आहे. युएस सिटिझनशिप अ‍ॅण्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) यांनी व्हिसासंदर्भात एक विधान जारी केले आहे. या विधानानुसार आर्थिक वर्ष 2025 साठी H-1B व्हिसाच्या रजिस्ट्रेशनची तारीख 22 मार्च असणार असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या व्हिसाच्या रजिस्ट्रेशनसाठीची तारीख
अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी नागरिकांकडे H-1B व्हिसा असणे महत्त्वाचे आहे. याच्या रजिस्ट्रेशनसाठीची सुरूवात 6 मार्चपासून झाली आहे. येत्या 22 मार्च दुपारी 12 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटे) असणार आहे.

व्हिसाचे रजिस्ट्रेशन ऑनलाइन पद्धतीने होणार
व्हिसासाठीचे रजिस्ट्रेशन ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. यासाठी myUSCIS अकाउंटचा वापर करावा लागणार आहे. अर्ज आणि व्हिसाचे शुल्क देखील ऑनलाइन पद्धतीनेच भरावा लागणार आहे. 

या कागदपत्रांची आवश्यकता
व्हिसाच्या रजिस्ट्रेशनसाठी वैध पासपोर्ट आणि प्रवासाच्या कागदपत्रांची सर्व माहिती द्यावी लागणार आहे. एखादी गडबड कागदपत्रांमध्ये आढळल्यास अर्ज रद्द केला जाणार आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर ज्या व्यक्तींची निवड केली जाईल त्यांना 31 मार्चपर्यंत myUSCIS ऑनलाइन अकाउंटवर व्हिसासंदर्भात माहिती दिली जाईल. यानंतर 1 एप्रिलपासून H-B कॅप पिटीशनसाठी ऑनलाइन फॉर्म जमा केले जातील. खरंतर, H-1B नॉन-कॅप पिटीशनची तारीख लवकरच जारी केली जाणार आहे.

व्हिसा शुल्कात वाढ
1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष 2025 साठी व्हिसासाठीचे अर्ज स्विकारले जाणार आहेत. व्हिसाच्या शुल्कात आता अमेरिकेने वाढ केली असून त्यासाठी नागरिकांना 10 डॉलर एवजी 110 डॉलर द्यावे लागणार आहेत. याशिवाय H-1B व्हिसाच्या रजिस्ट्रेशनसाठीचे शुल्क 10 डॉलवरुन 215 डॉलर झाले आहेत.

H-1B व्हिसा म्हणजे काय?
H-1B व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. या व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेतील कंपन्यांमध्ये परदेशी कामगारांना कामावर घेण्यासाठी दिला जातो. आतापर्यंत एखाद्या व्यक्तीचा H-1B व्हिसाची मूदत संपल्यास त्याला रिन्यू करण्यासाठी पुन्हा आपल्या मायदेशात परत यावे लागायचे. पण आता रिन्यू प्रक्रियेसाठी मायदेशी यावे लागणार नाही. अमेरिकेत राहूनही व्हिसा रिन्यू केला जाऊ शकतो.

आणखी वाचा : 

India Vs China GDP : जगाच्या जीडीपीमध्ये भारताचे योगदान वाढणार, चीनला टाकणार मागे

CAA संदर्भात अमेरिकेने व्यक्त केली चिंता, भारतात लागू करण्याच्या प्रक्रियेवर असणार करडी नजर

भारतातील पहिलीच अंडरवॉटर मेट्रो पाहून पाकिस्तानी नागरिक हैराण, दिल्या अशा प्रतिक्रिया (Watch Video)