India Vs China GDP : जगाच्या जीडीपीमध्ये भारताचे योगदान वाढणार, चीनला टाकणार मागे

| Published : Mar 19 2024, 08:59 AM IST / Updated: Mar 19 2024, 09:01 AM IST

gdp bengla

सार

भारतीय अर्थव्यवस्थेचे येणाऱ्या काही वर्षांमध्ये जगातील एकूण जीडीपीमधील योगदान वाढणार आहे. अशातच चीनचे जीडीपीमधील योगदान कमी होण्याची शक्यता आहे.

India Vs China GDP :  भारत जगात सर्वाधिक झपाट्याने पुढे जाणारी अर्थव्यवस्था बनला आहे. अशातच भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दरासंदर्भात वेगवेगळे अनुमान लावले जातात. तिसऱ्या तिमाहीतील विकासाच्या दराची आकडेवारी जारी करत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) कडून वर्ष 2023-24 साठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग 7.6 टक्के असण्याचा अनुमान लावण्यात आला होता.

यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले होते की, भारताच्या विकासाचा दर आठ टक्क्यांच्या आसपास पोहोचू शकतो. हाच अनुमान ग्लोबल रेटिंग एजेंसी मूडीज (Moody's) यांनी व्यक्त करत म्हटले होते की, भारताचा विकासाचा दर आठ टक्के असू शकतो.

अशातच आता ग्लोबल फाइनेंशिअल सर्विसेज कंपनी बार्कलेज (Barclays) यांनी म्हटले की, जगाच्या जीडीपीमध्ये भारताचे योगदान वाढणार आहे. अशातच चीनचे जीडीपीमधील योगदान कमी होण्याची शक्यता आहे. बार्कलेज यांच्या मते, चीनचा विकास दर पुढील पाच वर्षांदरम्यान भारताच्या विकास दरापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

पाच वर्षांपर्यंत 8 टक्के राहणार विकास दर
बार्कलेज यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल म्हटले की, वर्ष 2024-28 दरम्यान भारत आठ टक्के दराने विकास करू शकतो. रिपोर्ट्सनुसार, लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाल्यास पुढील काही वर्षांमध्ये आर्थिक धोरणे बदलणार नाहीत. ऑक्टोंबर महिन्याच्या तिमाहीत भारताच्या विकासाचा दर 8.4 टक्के राहिल्यानंतर बार्कलेज यांनी वर्ष 2023-24 साठी भारताच्या विकासाच्या दराचा अंदाज 6.7 टक्क्यांवरून 7.8 टक्के राहिल असे म्हटले आहे.

जगाच्या जीडीपीमध्ये भारताचे योगदान वाढणार
बार्कलेज यांच्यानुसार, सध्या जगाच्या जीडीपीमध्ये भारताचे योगदान 10 टक्क्यांहून अधिक आहे. भारताने वर्ष 2028 पर्यंत आठ टक्के दराने विकास केल्यास जगाच्या जीडीपीमधील भारताचे योगदान वाढून 16 टक्के होऊ शकते. याशिवाय चीनच्या विकासाचा दर सातत्याने कमी होत असल्याने जगाच्या जीडीपीमधील त्यांचे योगदानही कमी होत चालले आहे.

चीनने 4 ते 4.5 टक्के दराने विकास केल्यास जगाच्या जीडीपीमध्ये योगदान सध्याच्या 33 टक्क्यांनी कमी होत वर्ष 2028 पर्यंत 26 टक्के होईल. अशातच दिसते की, जगाच्या जीडीपीमध्ये  भारत आणि चीनची हिस्सेदारी 40 टक्क्यांहून अधिक राहिल.

आणखी वाचा : 

India Q3 GDP : तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.4 टक्क्यांवर, आरबीआयच्या अंदाजापेक्षाही अधिक

BJP कडून लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होणार, दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

Loksabha Election : NDA चे बिहारमध्ये झाले जागावाटप, भाजप 17 आणि नितीश कुमार 16 जागा लढवणार