सार

पश्चिम बंगालमध्ये भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली आहे. याबद्दल पाकिस्तानच्या नागरिकांना कळले असता ते हैराण झाले आहेत. पाकिस्तानी नागरिकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Viral Video : भारताच्या विकासाचे कौतुक संपूर्ण जगभरात केले जात आहे. देश दिवसागणिक प्रगतीच्या दिशेन वाटचाल करत आहे. अशातच देशात पहिलीच अंडरवॉटर मेट्रो (Underwater Metro) देखील सुरू करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन केले आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानातील रिपोर्टर भारतातील अंडरवॉटर मेट्रो रेल्वे दाखवत आहे. ही मेट्रो पाहून पाकिस्तानातील नागरिक हैराण झाले आहेत.

अंडरवॉटर मेट्रो पाहून पाकिस्तानी नागरिक हैराण
भारतातील अंडरवॉटर मेट्रो पाहून पाकिस्तानी नागरिक हैराण झाले आहेत. पाकिस्तानी नागरिकांनी म्हटले की, पाण्याखालून कशी ट्रेन धावू शकते. त्यांना विश्वासच बसत नाहीय, पाण्याखालून ट्रेन चालवली जाऊ शकते. पाकिस्तानी नागरिकांचा हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो नागरिकांनी पाहिला आहे.

याशिवाय रिपोर्टरने पाकिस्तानी नागरिकांना ही अंडरवॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणची आहे असा प्रश्न विचारले. काहींनी मेट्रो अमेरिका, चीन आणि जपानचे नाव घेतले. पण भारतातील अंडरवॉटर मेट्रो असल्याचे सांगितले असता ते हैराण झाले आहेत.

सोशल मीडियावर पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया
भारतातील अंडरवॉटर मेट्रो पाहिल्यानंतर काही पाकिस्तानी नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी म्हटले की, भारत वेगाने प्रगती करत आहेत. याशिवाय काहींनी पाकिस्तान सरकारला सुनावले आहे.

आणखी वाचा : 

Video : विमानाच्या उड्डाणानंतर वेगळे झाले चाक, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढील पाच वर्षांमध्ये भारत जगाच्या विकासाचे कारण ठरेल, IMF चे भाकीत

पाकिस्तानमधील महिलेच्या ड्रेसवरुन भडकले नागरिक, जमावाने मागणी करत म्हटले..... (Watch Video)