Video : विमानाच्या उड्डाणानंतर वेगळे झाले चाक, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

| Published : Mar 08 2024, 11:24 AM IST / Updated: Mar 08 2024, 11:27 AM IST

PLANE
Video : विमानाच्या उड्डाणानंतर वेगळे झाले चाक, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये दिसतेय की, विमानाच्या उड्डाणानंतर त्याचे चाक वेगळे होत जमिनीवर पडले गेले.

Viral Video : अमेरिकेतील सॅन फ्रांन्सिसको येथून जपानला (Japan) जाणाऱ्या युनाइटेड एअरलाइन्सच्या (United Airlines) विमानासोबत एक विचित्र घटना घडली आहे. खरंतर, विमानाने उड्डाण केल्याच्या काही सेकंदात त्याचे एक चाक निघत जमिनीवर पडले गेले. या प्रकरणाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की, कशाप्रकारे चाक विमानापासून वेगळे होत जमिनीवर पडले गेले. या प्रकरणात कोणत्याही प्रवाशाचे नुकसान झाले आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, विमानाच्या लँडिगनंतर सहा चाकांपैकी एक चाक खाली पडले गेले. दरम्यान, चाक सॅन फ्रांन्सिसको आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका कर्मचाराच्या कार पार्किंगच्या येथे पडले गेले. यामुळे बॅरिकेटिंग आणि कारला नुकसान पोहोचले गेले. याशिवाय पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन-तीन कारचे देखील नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

युनाइटेड एअरलाइन्सने घटनेसंदर्भात दिली प्रतिक्रिया
एअरलाइन्सने म्हटले की, वर्ष 2002 मध्ये तयार करण्यात आलेल्या बोइंग 777 विमानाला खराब झालेल्या टायरसह सुरक्षित लँडिंग करण्याच्या दृष्टीकोनातून डिझाइन केले होते. या प्रकारानंतर विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पुढील प्रवासाठी नेण्यात आले.

आणखी वाचा : 

पुढील पाच वर्षांमध्ये भारत जगाच्या विकासाचे कारण ठरेल, IMF चे भाकीत

बांग्लादेशची राजधानी ढाका येथे सात मजली इमारतीला भीषण आग, 43 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

पाकिस्तानमधील महिलेच्या ड्रेसवरुन भडकले नागरिक, जमावाने मागणी करत म्हटले..... (Watch Video)