सार
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बुधवारी (6 मार्च) एक पुर्वानुमान जारी करण्यात आला आहे. यानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये भारत जगाच्या विकासाचे कारण ठरणार असल्याचे म्हटले आहे.
Global Economics Growth : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) बुधवारी (6 मार्च) एक पुर्वानुमान जारी करण्यात आला आहे. यानुसार, भारत पुढील पाच वर्षांमध्ये चीन, अमेरिका आणि इंडोनेशियासोबत मिळून जागतिक आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार असल्याचे म्हटले आहे. या काळादरम्यान जगातील अर्ध्याहून अधिक आर्थिक विस्तारात या चार देशांचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे.
गेल्या वर्षात सप्टेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले होते की, भारतासह जगातील तीन अन्य देश पुढील पाच वर्षांमध्ये जगाच्या आर्थिक प्रगतीमध्ये फार मोठे योगदान देतील. यानंतर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीन देशांची नावे जारी केली आहेत.
जागतिक रेटिंग एजेंसी मूडीजने सोमवारी (4 मार्च) भारताच्या जीडीपीसंदर्भात (GDP) एक पुर्वानुमान सांगितला होता, जो देशाची प्रगती दाखवतो. रेटिंग एजेंसीने आपल्या ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2024-25 मध्ये म्हटले होते की, भारताच्या अर्थव्यवस्थेने उत्तम कामगिरी केली आहे. भारताचा 2024 मधील विकासाचा अनुमान 6.1 टक्क्यांवरुन 6.8 टक्क्यांवर आला आहे. याशिवाय मूडीजने म्हटले होते की, भारत जी-20 देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचा परिणाम नाही
भारताची अर्थव्यवस्था डिसेंबर तिमाहित 8.14 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. यावरुन कळते की, भारताच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचा कोणताही परिणाम झालेला नाही. दुसऱ्या बाजूला चीन सारख्या विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे दिसून आले. याशिवाय मार्केटमध्ये कोरोनानंतर फार मोठे नुकसान सहन करावे लागले. नुकत्याच इंग्लंडने घोषणा केली होती की, त्यांचा देश आर्थिक मंदीचा सामना करत आहे.
आणखी वाचा :
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झालेल्या शहबाज शरीफ यांना PM नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
पाकिस्तानमधील महिलेच्या ड्रेसवरुन भडकले नागरिक, जमावाने मागणी करत म्हटले..... (Watch Video)