सार
पाकिस्तानातील एका महिलेने असा ड्रेस परिधान होता की, त्यावरुन गदारोळ निर्माण झाला. खरंतर, नागरिकांनी त्या महिलेने कुरानचा कथित रुपात अपमान केल्याचा आरोप लावला. याशिवाय महिलेला ड्रेस बदलण्याही सांगण्यात आले.
Viral Video : पाकिस्तानातील लाहौर येथील एका महिलेने एक विशिष्ट प्रिंट असणारा ड्रेस परिधान केला होता की, त्यावरुन नागरिकांनी गर्दी करत गदारोळ निर्माण केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील महिलेने आपला चेहरा झाकल्याचे दिसून येत असून महिला पोलीस कर्मचारी तिला गर्दीतून बाहेर काढताना दिसतेय.
नक्की काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने खास प्रकारचा ड्रेस परिधान केलाय. त्यावर काहीतरी लिहिल्याचे दिसतेय. गर्दी केलेल्या नागरिकांनी महिलेच्या ड्रेसवर कुरानमधील काही गोष्टी लिहिल्याचे म्हटले. यावरुनच गदारोळ निर्माण होत गर्दी केलेल्या नागरिकांकडून महिलेच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली.
पोलीस महिला कर्मचाऱ्याने महिलेला गर्दीतून सुखरुप काढले बाहेर
एका पोलीस कर्मचारी महिलेने व्हिडीओमधील महिलेला गर्दीच्या घोळक्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला जमावाकडून महिलेच्या विरोधात घोषणाबाजी केली जात असल्याचे दिसून येत आहे.
खरंतर, महिला आपल्या पतीसोबत शॉपिंग करण्यासाठी गेली होता. महिलेने जो कुर्ता परिधान केला होता त्यावर काही शब्द लिहिले होते. नागरिकांनी महिलेचा कुर्ता पाहिला असता तिला तो बदलण्यास सांगितला आणि अशातच नागरिकांची मार्केटमध्ये गर्दी वाढली गेली.
महिलेने मागितली माफी
महिलेने या घटनेसंबंधित माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये महिला म्हणतेय की, "मला त्या कुर्त्याची डिझाइन आवडल्याने खरेदी केला होता. मी कधीच विचार केला नव्हता की, नागरिक अशाप्रकारचा विचार करतील. माझा कुरानचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. यामुळे मी माफी मागत आहे."
आणखी वाचा :
खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली US मधील भारतीय महिला, गमावले तब्बल चार कोटी रुपये
तरुणाच्या नाकातून डॉक्टरांनी काढले चक्क 150 जिवंत किडे, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर
एकट्या टाटा समूहाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला टाकले मागे, रिपोर्टमधून खुलासा