सार
बांग्लादेशची राजधानी ढाका येथे सात मजली इमारतीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 43 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.
Bangladesh Fire : बांग्लादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी (29 फेब्रुवारी) रात्री उशिरा एका सात मजली इमारतीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 43 जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुर्घटनेतील नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बांग्लादेशचे आरोग्य मंत्री सामंत लाल सेन यांनी AFP मीडियाशी बोलताना म्हटले की, आग लागल्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय रुग्णालयात 40 जखमींवर उपचार सुरू आहेत.
आग लागल्याच्या दुर्घटनेची माहिती देत अग्निशनम दलाच्या विभागाचे अधिकारी मोहम्मद शिहाब यांनी म्हटले की, ढाका येथील बेली रोड जवळील एका लोकप्रिय बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी आग लागली. आग इमारतीपर्यंत पोहोचली असता रहिवाशी अडकले गेले. आग ऐवढी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप वेळ लागला. आगीतून 75 नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
बांग्लादेशात आग लागण्याच्या घटना
बांग्लादेशात सुरक्षा नियमांमध्ये हलगर्जीपणा केला जात असल्याने काही इमारती आणि फॅक्टरी परिसरात आग लागण्याच्या घटना घडणे सर्वसामान्य आहे. याआधी वर्ष 2021 मध्ये एका फूड कारखान्याला आग लागल्याने काही मुलांसह 52 जणांचा जीव गेला होता.
आणखी वाचा :
खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली US मधील भारतीय महिला, गमावले तब्बल चार कोटी रुपये
तरुणाच्या नाकातून डॉक्टरांनी काढले चक्क 150 जिवंत किडे, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर
Shocking : तरुणाचा वडील-भावासह 12 नातेवाईकांवर गोळीबार, या कारणामुळे केली सामूहिक हत्या