सार
Sam Pitroda Statement : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील कायद्याचा हवाला दत म्हटले की, अमेरिकेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या अर्ध्या संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती सरकारच्या खात्यात जाते. पण भारतात….
Sam Pitroda Statement : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी देशात संस्थागत आणि आर्थिक सर्व्हे करण्यासह संपत्तीच्या पुनर्वितरणाबद्दच्या मुद्द्यावरून भाष्य केले होते. यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, काँग्रेस देशातील नागरिकांची संपत्ती लुटू पाहत आहे. हा वाद मिटत नाही तोवर काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राजकरण तापले आहे.
काय म्हणाले सॅम पित्रोदा?
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदांनी म्हटले की, अमेरिकेतील वारसा कर फार वेगळा आहे. यानुसार तुम्ही आयुष्यात खूप संपत्ती जमा केली असेल. पण तुमच्या मृत्यूनंतर संपत्ती जनतेसाठी पाठी सोडली पाहिजे. संपूर्ण संपत्ती नव्हे अर्धी संपत्ती असावी, असे मला योग्य वाटते. पण भारतात असा कायदा नाही.
यापुढे बोलताना सॅम पित्रोदा यांनी म्हटले की, "अमेरिकेत एखाद्याजवळ 100 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असल्यास आणि त्याचा मृत्यू झाल्यास त्यामधील केवळ 45 टक्के हिस्सा मुलांना मिळतो. उर्वरित 55 टक्के हिस्सा सरकारला मिळतो. खरंतर हा एक उत्तम कायदा आहे. भारतात असा कायदा नाही. एखाद्याची संपत्ती 10 अब्ज असल्यास आणि त्याचे निधन झाल्यास, ती संपूर्ण संपत्ती मुलांना मिळतो. जनतेला काहीही मिळत नाही...हे असे मुद्दे आहेत ज्यावर नागरिकांनी वाद आणि चर्चा केली पाहिजे."
काँग्रेसने समान संपत्तीच्या वितरणाची पॉलिसी तयार करेल- सॅम पित्रोदा
सॅम पित्रोदा यांनी म्हटले की, राहुल गांधी किंवा काँग्रेसने घोषणापत्रात धनवानांची संपत्ती वाटण्याचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी असे म्हटलेय की, काँग्रेस पक्ष अशी पॉलिसी तयार करेल ज्यामुळे संपत्तीचे समान वितरण होईळ. जसे की, भारतात किमान वेतन नाही. आज काय होतोय की, श्रीमंत नागरिक घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन देत नाही. पण तेच पैसे दुबई अथवा लंडन येथे खर्च करतात. ज्यावेळी तुम्ही धन वितरणाबद्दल बोलता तेव्हा असे नाही की, तुम्ही बसून बोलाल माझ्याकडे एवढा पैसा आहे आणि तो सर्वांमध्ये वाटेन. अशाप्रकारचा विचार करणे अत्यंत चुकीचे आहे.
भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल
भाजप प्रवक्ते अमित मालवीय यांनी म्हटले की, “काँग्रेसने देशाला नष्ट करण्याचा निर्णयच घेतला आहे. आता सॅम पित्रोदा 50 टक्के वारसा कराची बाजू घेत आहे. याचा अर्थ असा होतो की, काँग्रेसचे सरकार आल्यास व्यक्तीने आयुष्यात मेहनतीने मिळवलेल्या संपत्तीमधील पाच टक्के हिस्सा बळकावला जाईल. याशिवाय जो काही टॅक्स देतो तो देखील वाढला जाईल..”
आणखी वाचा :
US : इंधन घेऊन जाणाऱ्या एअरक्राफ्टचा अलास्कामध्ये अपघात, दोन जणांचा मृत्यू