US : इंधन घेऊन जाणाऱ्या एअरक्राफ्टचा अलास्कामध्ये अपघात, दोन जणांचा मृत्यू

| Published : Apr 24 2024, 08:32 AM IST

Cessna 182 aircraft

सार

Aircraft Crash : युएसमधील अलास्का नदीत इंधन घेऊन जाणाऱ्या एका एअरक्राफ्टचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

US : इंधन घेऊन जाणाऱ्या डगलस सी-54 विमानाचा फेअरबँक्स, अलास्का येथे उड्डाणानंतर अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. एअरक्राफ्ट फ्रोझन नदीत कोसळले गेले. या दुर्घटनेची माहिती एबीसी न्यूजने राष्ट्रीय परिवह सुरक्षा बोर्डाच्या हवाल्याने दिली आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन यांच्यानुसार, विमानात दोनजण होते. या दोघांचाही मृत्यू झाला आहे. सध्या दुर्घटनेचा अधिक तपास फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनकडून केला जातोय.

फेअरबँक्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केले होते उड्डाण
अधिकाऱ्यांनी म्हटले प्राथमिक तपासात समोर आलेय की, एअरक्राफ्टने स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजताच्या आसपास फेअरबँक्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. यानंतर लगेच एअरक्राफ्टचा अपघात झाला.

दरम्यान, अमेरिकेतील अलास्कामध्ये तानाना नदी (Tanana river) सर्वसामान्यपणे ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान भरते. हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असल्याने मोठ्या प्रमाणात बर्फ साचला जातो. जवळजवळ 110 सेमीचा बर्फ जमा होतो.

एअरक्राफ्टचा डोंगराळ भागात अपघात
अलास्काच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने म्हटले की, विमान नदीच्या किनाऱ्याला असणाऱ्या एका डोंगराळ भागात कोसळले गेले. यामुळे एअरक्राफ्टला आग लागली. यामध्ये असणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. एबीसी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, सध्या दुर्घटनास्थळी अधिक तपास केला जात आहे.

आणखी वाचा : 

Schengen Visa : भारतीयांना युरोपातील 29 देशांत फिरणे होणार सोपे, युरोपीय युनियनकडून व्हिसाच्या नियमांत बदल

Earthquake : ताइवानमध्ये जाणवले 80 भूकंपाचे धक्के, भीतीपोटी नागरिकांनी घरातून काढला पळ