सार
Schengen Visa : भारतातील नागरिकांना युरोपातील 29 देशांमध्ये फिरणे सोपे होणार आहे. कारण युरोपीय युनियनकडून व्हिसाच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.....
Schengen Visa New Rules : युरोपियन युनियनच्या देशांमध्ये जाणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नागरिकांना दीर्घकाळ व्हॅलिडिटी असणाऱ्या मल्टीपल एण्ट्री शेंगेन व्हिसासाठी अर्ज करू शकतात. खरंतर, युरोपियन युनियनने शेंगेन व्हिसासंबंधित काही नियमांत बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार आता पाच वर्षांसाठी मल्टीपल एण्ट्री असणाऱ्या शेंगेन व्हिसासाठी अर्ज करता येणार आहे. खरंतर, युरोपीय देशांमध्ये प्रवास करण्यासाठी शेंगेन व्हिसा असणे अत्यावश्यक आहे. या व्हिसाच्या माध्यमातून पर्यटकांना वेगवेगळ्या युरोपियन देशांमध्ये फिरता येते.
18 एप्रिलपासून नवे नियम लागू
युरोपियन कमीशनने 18 एप्रिलला भारतीय नागरिकांसाठी मल्टीपल एण्ट्री व्हिसा जारी करण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. सध्याच्या व्हिसाच्या नियमांच्या तुलनेत नव्या नियमांमध्ये काही गोष्टींसाठी सूट देण्यात आली आहे.
नव्या नियमानुसार, भारतात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना गेल्या तीन वर्षांमध्ये कायदेशीर रुपात व्हिसा मिळवणे आणि वापर केल्यानंतर दोन वर्षांसाठी व्हॅलिड लॉन्ग टर्म, मल्टीपल-एण्ट्री शेंगेन व्हिसा जारी केला जाऊ शकतो. याच्या सुरूवातीच्या दोन वर्षांच्या व्हिसानंतर पाच वर्षांचा व्हिसा मिळू शकतो. पण अट अशी आहे की, पासपोर्टची पुरेशी व्हॅलिडिटी शिल्लक असणे आवश्यक आहे. याशिवाय एक्सटेंडेड व्हॅलिडिटी प्रवाशांना कोणत्याही 180 दिवसांच्या आत 90 दिवसांपर्यंत शेंगेन परिसरात स्वातंत्र्याने फिरण्यास परवानगी मिळणार आहे.
या 29 देशांमध्ये प्रवास करणे होणार सोपे
शेगेंनच्या व्हिसासंदर्भातील नव्या नियमानुसार, 29 देशांमधअये प्रवास करता येणार आहे. शेंगेन परिसरातील 29 युरोपीयन देशांचा समावेश आहे. त्यापैकी 25EU स्टेट्सचा समावेश आहे.
शेंगेन क्षेत्रात कोणते देश येतात?
ऑस्ट्रिया, बेल्जियम, बुल्गारिया, क्रोएशिया, चेकिया, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगरी, आइसलँड, इटली, लातविया, लिकटेंस्टीन, लिथुआनिया, लक्ज़मबर्ग, माल्टा, नीदरलँड, नॉर्वे, पोलंड, पुर्तगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड.
आणखी वाचा :