Ram Mandir Pran Pratishtha : भारतच नव्हे तर संपूर्ण जग रामललांच्या भक्तीरसात तल्लीन (See Photos)

| Published : Jan 22 2024, 02:29 PM IST / Updated: Jan 22 2024, 02:35 PM IST

Ayodhya whole world

सार

रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज पार पडला. देशभरात दिवाळी सणासारखे वातावरण आहे. याशिवाय जगभरातही रामललांच्या प्राणप्रतिष्ठेची धूम पाहायला मिळत आहे. नेपाळमधील जनकपुर येथील जानकी मंदिराला सुंदर सजावट करण्यात आली आहे.

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत आज (22 जानेवारी) राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. देशभरात सर्वत्र आनंद-उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय जगभरात रामललांचे स्वागत केले जात आहे. नेपाळमधील (Nepal) जनकपुरमध्ये जानकी मंदिराला सुंदर सजावट करण्यात आली आहे. विदेशात न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवरच्या येथेही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा केला जात आहे.

नेपाळमधील जानकी मंदिर
नेपाळमधील जनकपुर येथील जानकी मंदिर परिसरात 1 लाख 25 हजार मातीचे दिवे प्रज्वलीत केले जाणार आहेत.

न्यूयॉर्कमधील वातावरण राममय
न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर (Times Square) रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथे रामललांची फोटो एलईडी स्क्रिनवर दाखवले जात आहेत.

फ्रान्समध्येही रामनामाचा गजर
फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये (Paris) रामभक्तांनी रॅलीचे आयोजन केले होते. येथे विश्व कल्याण यज्ञ देखील करण्यात आले.

मॉरिशसचे पंतप्रधानही रामललांच्या भक्तीरसात मग्न
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार (Pravind Kumar)  यांनी रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पत्नीसोबत मंदिरात दिवे प्रज्वलीत केले. याशिवाय प्रविंद कुमार यांनी म्हटले की, आपण अयोध्येत आलेल्या रामललांचे स्वागत करण्यासह उत्साह साजरा करतोय. यानिमित्त त्यांनी हिंदूंना कामातून दोन तासांचा ब्रेकही देण्याची घोषणा केली होती. 

कॅनडात साजरा केला जातोय मंदिर डे
आज कॅनडामध्ये काही शहरांमध्ये रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त ‘राम मंदिर डे’ घोषित करण्यात आला आहे.

लंडनमध्ये कार रॅली
ब्रिटेनमध्ये भारतीयांनी रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कार रॅली काढली होती. याशिवाय काही ठिकाणी लाइव्ह प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

आणखी वाचा : 

Ram Mandir Pran Pratishtha : ब्रिटेन, अमेरिकेत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेची धूम, रामभक्तांकडून रामनामाचा गजर (Watch Video)

ऑस्ट्रेलियात उभारले जातेय सर्वाधिक उंच राम मंदिर, मिळणार या सुविधा

विश्व हिंदू परिषदेकडून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी अमेरिकेत खास कार्यक्रमाचे आयोजन, भारतीयांनी दिल्या 'जय श्री राम'च्या घोषणा (Watch Video)

Read more Articles on