सार

येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेत एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले.

Ram Mandir Ceremony : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. तत्पपूर्वी देशात-विदेशात राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर काही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेतील मेरीलँड (Merryland) येथे एपिक टेस्ला म्युझिकल लाइट शो (Tesla musical light show) चे आयोजन केले होते. यादरम्यान अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी जय श्री रामाच्या घोषणाही दिल्या.

'टेस्ला म्युझिकल लाइट शो'चा एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेतील भारतीय नागरिक प्रभू श्रीरामांचा फोटो असणारे झेंडे फडकवत 'जय श्री राम' आणि 'राम लक्ष्मण जानकी, जय श्री हनुमान की' अशा घोषणा देखील देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

राम फॉर्मेशनमध्ये उभ्या केल्या गाड्या
टेस्ला कार लाइट शो चे आयोजन विश्व हिंदू युएस चॅप्टरकडून (Vishwa Hindu Parishad of America) करण्यात आले. यावेळी राम फॉर्मेशनमध्ये (Ram Formation) जवळजवळ 150 पेक्षा अधिक कार उभ्या करण्यात आल्या होत्या. कारच्या माध्यमातून लाइट शो करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मेरीलँडमधील प्रभू श्रीरामांचे भक्त अंजनेय मंदिराजवळ एकत्रित आले होते. अंजनेय मंदिर हे अमेरिकेतील 'अयोध्या वे' नावाच्या मार्गावर आहे.

दरम्यान, टेस्लाच्या कारमध्ये सिंक्रोनाइज्ड लाइट शो करण्याची क्षमता आहे. एक कार दुसऱ्या कारला जोडून अशा प्रकारचा लाइट शो केला जातो. यामध्ये शेकडो कार एकमेकांना जोडल्या जाऊ शकतात. अशातच लाइट शो वेळी सर्व कारमधून क्रमाक्रमाने लाइट येते. भारतीय नागरिकांकडून आयोजित करण्यात आलेल्या टेस्ला लाइट शो मध्ये 150 हून अधिक गाड्या होत्या. सर्व गाड्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या होत्या.

आणखी वाचा : 

अमेरिकेतील राज्यांमध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे लावण्यात आलेत 40 बिलबोर्ड्स, टाइम्स स्क्वायरवर दाखवले जाणार सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण

Ayodhya Ram Mandir : परदेशातही होणार राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष, अमेरिकेत काढली जाणार कार रॅली

Ram Mandir Pran Pratishta : मॉरिशस सरकारची मोठी घोषणा, 22 जानेवारीला मिळणार 2 तासांची विशेष सुटी