World

Ram Mandir

ऑस्ट्रेलियात उभारले जातेय सर्वाधिक उंच राम मंदिर, मिळणार या सुविधा

Image credits: Our own

ऑस्ट्रेलियातील भव्य राम मंदिर

ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला असणाऱ्या पर्थ (Perth) शहरात इंटरनॅशनल श्रीराम वेदिक अ‍ॅण्ड कल्चरल युनियनकडून (ISVACU) भव्य राम मंदिराची उभारणी केली जात आहे.

Image credits: twitter

721 फूट उंचीचे असणार मंदिर

जगातील सर्वाधिक मोठ्या राम मंदिराची उंची 721 फूट असणार असल्याचा अंदाज लावण्यात आले आहे. हे मंदिर ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे उभारले जातेय.

Image credits: Social Media

मंदिरासाठी खर्च

इंटरनॅशनल श्रीराम वेदिक अ‍ॅण्ड कल्चरल युनियनकडून भव्य राम मंदिरासाठी 150 एकर जमिनीवर 7600 कोटी रूपयांचा खर्च करून मंदिर उभारले जाऊ शकते. 

Image credits: twitter

मंदिरातील खास सुविधा

मंदिरामध्ये एक योगा आणि मेडिटेशन केंद्र, सांस्कृतिक केंद्र, अतिथी गृह, वेदांबद्दल शिकण्यासाठीचे केंद्र, सामुदायिक हॉल आणि परमार्थ किचन अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत.

Image credits: Our own

आर्ट गॅलरी आणि ग्रंथालय

मंदिरामध्ये आर्ट गॅलरी आणि ग्रंथालय देखील असणार आहे. यामध्ये प्राचीन पुस्तके, रामायण आणि अन्य विषयांवरील पुस्तके ठेवण्यात येणार आहेत.

Image credits: Our own

वंचितांना शिष्यवृत्ती

मंदिराकडून सांस्कृतिक कार्यक्रमांची योजनाही तयार करणार आहे. याशिवाय आर्थिक व सामाजिक रुपात वंचितांना शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे.

Image credits: social media