पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झालेल्या शहबाज शरीफ यांना PM नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

| Published : Mar 05 2024, 10:09 AM IST / Updated: Mar 05 2024, 10:52 AM IST

shehbaz sharif Narendra Modi

सार

पाकिस्तानात शहबाज शरीफ रविवारी (3 मार्च) दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहबाज शरीफ यांना पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहबाज शरीफ यांना पाकिस्ताचे पंतप्रधान झाल्याने शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर ट्विट केले आहे. पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले की, “शहबाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या रुपात शपथ घेतल्याने शुभेच्छा देतो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छाचे ट्विट अशावेळी आहे जेव्हा एक दिवस आधी (4 मार्च) शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ‘ऐवान-ए-सद्र’ (राष्ट्रपती भवन) मध्ये झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा भाऊ शहबाज शरीफ वर्ष 2022 मध्ये दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. ते देशाचे 24वे पंतप्रधान आहेत.

दरम्यान, पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) पक्षाला एकूण 75 जागांवर विजय मिळाला होता. याशिवाय पाकिस्तान पीपल्स पार्टीला (PPP) 54 जागांवर समाधान मानावे लागले होते.

इमरान खान यांच्या पक्षाचा पराभव

पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान मंगळवारी (13 फेब्रुवारी) पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी (Bilawal Bhutto-Zardari) हे पाकिस्तानतील पंतप्रधानांच्या शर्यतीतून बाहेर पडले. यानंतर बिलावल भुट्टो जरदारी यांनी घोषणा केली की, पक्ष नव्या सरकारचा हिस्सा होणार नसून माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पक्षाचे समर्थन करेल.

दुसऱ्या बाजूला, तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफकडून (Pakistan Tehreek-e-Insaf) स्वतंत्रपणे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत 92 जागांवर यश मिळवता आले. पण आपल्या बळावर सत्ता स्थापन करण्यास असमर्थ राहिले. याशिवाय पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) किंवा पाकिस्तान पीपल्स पार्टीसोबत युती करण्यास नकार दिला होता. 

आणखी वाचा : 

बांग्लादेशची राजधानी ढाका येथे सात मजली इमारतीला भीषण आग, 43 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची भेट, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाले...

US On Moon : अमेरिकेने 50 वर्षानंतर पुन्हा रचला इतिहास, ठेवले चंद्रावर यशस्वीपणे पाऊल