सार

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट झाली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी बिल गेट्स यांना भेटल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

PM Modi Meets Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी गुरुवारी (29 फेब्रुवारी) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, बिल गेट्स यांनी पंतप्रधानांसोबत आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, महिलांसंबंधित विकासाचे मुद्दे, कृषी क्षेत्रातील विकास, आरोग्य आणि भारतासंबंधित काही मुद्द्यांवर चर्चा केली.

याशिवाय बिल गेट्स यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये बिल गेट्स यांनी म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणे नेहमीच प्रेरणादायी असते आणि चर्चेसाठी खूप काही विषय असतात. आम्ही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली, ज्यामुळे आपल्या समाजाला एक नवी दिशा मिळू शकते.” 

बिल गेट्स यांना भेटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फार आनंदीत झाले होते. पंतप्रधानांनी देखील सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिलेय की, "आमची भेट अद्वितीय होती. आम्हाला नेहमीच त्या क्षेत्राशी चर्चा करण्यास आनंद होतो ज्यामुळे आपल्यासह जगभरातील लाखो नागरिकांना सशक्त बनवण्यास मदत करेल."  बिल गेट्स यांनी पंतप्रधानांशिवाय संरक्षण मंत्री एस. जयशंकर (External Affairs Minister S Jaishanka) यांची देखील भेट घेतली. या दोघांनी एकमेकांना पुस्तक भेट म्हणून दिले.

आणखी वाचा : 

India Q3 GDP : तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.4 टक्क्यांवर, आरबीआयच्या अंदाजापेक्षाही अधिक

PM Surya Ghar Muft Bijli Yojana : पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत एक कोटी घरांवर लावण्यात येणार सोलर पॅनल्स, 300 यूनिट वीज मोफत मिळणार

Watch Video: तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहांला अटक केल्यानंतर संदेशखळीतील नागरिकांनी व्यक्त केला आनंद