Dubai Rains : दुबईत पावसाचा हाहाकार, विमानतळ पाण्याखाली जाण्यासह ओमानमध्ये 18 जणांचा मृत्यू

| Published : Apr 17 2024, 08:09 AM IST / Updated: Apr 17 2024, 08:12 AM IST

Dubai Flood

सार

Dubai Rains : युएईमधील राष्ट्रीय हवामान खात्याने म्हटले की, मंगळवार (16 एप्रिल) पासून ते बुधवारी सकाळपर्यंत (17 एप्रिल) हवामान बिघडलेले असणार आहे. याचा परिणाम पश्चिम क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे.

Dubai Rains Update : संयुक्त अरब अमिरातीसह (UAE) आसपासच्या क्षेत्रामध्ये मंगळवारी (16 एप्रिल) मुसळधार पाऊस झाला. यामुळे युएईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. याशिवाय ओमानलाही (Oman) पावसाने झोडपून काढल्याने पुर आला. या पुरात 18 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ओमानमध्ये पुराची परिस्थिती
ओमानमधील पुराच्या परिस्थितीमुळे शहरात ट्राफिक जाम झाले होते. रस्ते ते विमान उड्डणांच्या प्रवासावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. दुबईतील विमानतळ जलयम झाले आहे. याआधी सोमवारी (15 एप्रिल) दुबई पोलिसांनी नागिरकांना बिघडलेल्या हवामानामुळे सार्वजनिक सुरक्षितता गाइडलाइन्स जारी केल्या होत्या.

युएईमधील राष्ट्रीय हवमान खात्याने म्हटले की, मंगळवार दुपारपासून ते बुधवारी सकाळपर्यंत हवामान बिघडलेले असेल. याचा परिणाम पश्चिम क्षेत्रांवर होण्यासह नंतर संपूर्ण देशातही वातावरण बिघडले जाईल. (Dubai madhe paus)

हवामान बिघडलेले राहणार
देशातील राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीने सांगितले की, रविवारी (14 एप्रिल) आणि सोमवारी (15 एप्रिल) ओमानच्या वेगवेगळ्या ठिकाणी अचानक पुर आला. यानंतर पुरात कमीत कमी 18 जणांचा मृत्यू झाला. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी दुबईत आला होता पुर
गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात दुबईतील हवामान बिघडले गेले. त्यावेळी मुसळधार पावसाने शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती ऐवढी बिघडली होती की, प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना समुद्र किनारी जाण्यापासून रोखले होते.

आणखी वाचा : 

इस्रायलमधील ही 5 जण ठरवणार इराणवर कधी आणि कसा करायचा हल्ला....जाणून घ्या नेतन्याहूंच्या वॉर कॅबिनेटबद्दल सविस्तर

Iran Israel Attack : "मिशन ट्रू प्रॉमिस" च्या माध्यमातून इराणचे उद्दिष्ट्य साध्य ; चिथावणी दिल्यास मोठ्या कारवाईचा इशारा