इस्रायलमधील ही 5 जण ठरवणार इराणवर कधी आणि कसा करायचा हल्ला....जाणून घ्या नेतन्याहूंच्या वॉर कॅबिनेटबद्दल सविस्तर

| Published : Apr 16 2024, 09:24 AM IST / Updated: Apr 16 2024, 09:33 AM IST

Benjamin Netanyahu

सार

Israel Iran War : इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इज्राइलमधील वॉर कॅबिनेट अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. इज्राइल म्हणतेय की, इराणने केलेल्या हल्ल्याचे आम्ही सडेतोड उत्तर देऊ. इस्राइमधील पाच जण अशी आहेत जी इराणवर कधी आणि कसा हल्ला करायचा याची रणनिती ठरवतात. 

Israel Iran War : हमास (Hamas) आणि इज्राइलमध्ये युद्ध सुरू होते. अशातच मध्य पूर्वेतील आणखी एका युद्धामुळे धोका वाढला गेला आहे. 14 एप्रिलला इराणने (Iran) इज्राइलवर हल्ला केला होता. खरंतर, इज्राइलवर इराणकडून करण्यात आलेला हल्ला 1 एप्रिलला सीरियाची राजधानी दश्मिकमधील त्यांच्या वाणिज्य दूतवासावर केलेल्या हल्ल्याचे उत्तर होते. वाणिज्य दूतवासावर हल्ला करण्यामागे इराणने इस्राइलला दोषी ठरवले होते.

इराणी सैन्याने आमचे उद्देश पूर्ण झाला असून हल्ला करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. इराणकडून असेही बोलले जातेय की, “अमेरिका किंवा इज्राइलकडून हल्ला करण्यात आल्यास त्याचे आम्ही सडेतोड उत्तर देऊ.”

दुसऱ्या बाजूला इज्राइलने दावा केला होता की, इरणाची 99 टक्के क्षेपणस्रे आणि ड्रोन उडवले होते. इज्राइल हे देखील म्हणतोय, “योग्य वेळ आल्यास आम्ही याची योग्य किंमत वसूल करू.”

वॉर कॅबिनेट नक्की काय आहे?
गेल्या वर्षात 7 ऑक्टोंबरला हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इज्राइलमध्ये ‘युनिटी गर्व्हमेंट’ तयार झाले. या सरकारमध्ये विरोधी पक्षाचे नेतेही होते. पण एक अट अशी होती की, एक वॉर कॅबिनेट तयार करायचे. या कॅबिनेटचा उद्देश गाजामध्ये हमासच्या विरोधातील युद्धाची रणनिती आखायची. वॉर कॅबिनेटमधील तीन सदस्य फार महत्त्वाचे आहेत. यामध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, संरक्षणमंत्री योआव गॅलेंट (Yoav Gallant) आणि विरोधीपक्ष नेते बेनी गँट्झ (Benny Gantz). यांच्या व्यतिरिक्त गॅडी आईसेनकोट आणि रॉन डर्मर यांना ऑब्जर्वरच्या रूपात कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.

वॉर कॅबिनेटचे काम
हमाससोबतच्या युद्धानंतर तयार करण्यात आलेल्या वॉर कॅबिनेटकडून युद्धाची रणनिती आखली जाते. वॉर कॅबिनेटमध्ये एकूण पाच सदस्य आहेत. पण अन्य मंत्री आणि सैन्यासंबंधित काहीजणही वॉर कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी होतात. खरंतर, इस्राइजलच्या संविधानात अद्याप असा एकही कायदा नाही ज्यामध्ये वॉर कॅबिनेटच्या अधिकारांची स्पष्टता देईल. पण तरीही वॉर कॅबिनेट फार महत्त्वाचे आहे. वॉर कॅबिनेटकडून युद्ध कधी आणि कसे केले जाणार याची रणनिती आखली जाते. जरी युद्ध संपवायचे असल्यास तरीही वॉर कॅबिनेटची मंजूरी घेणे आवश्यक आहे.

इस्राइल इरणावर करणार का हल्ला?
‘द गार्डियन’ वृत्तपत्रानुसार, अमेरिका (US) आणि इज्राइलमधील मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा करण्यात आलाय की, 14 एप्रिलला रात्री इज्राइलच्या वॉर कॅबिनेटने इराणच्या हल्ल्याचे उत्तर देण्याचे ठरविले होते. पण त्याचदिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी इज्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यासोबत फोनवर 25 मिनिटे बातचीत केली. यावेळी इराणवर हल्ला न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

आणखी वाचा : 

Iran Israel Attack : इराणने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यामुळे तेथील भारतीय नागरिक सावध, भारतीय दूतावासाने जारी केला हेल्पलाईन क्रमांक

Iran Israel Attack : "मिशन ट्रू प्रॉमिस" च्या माध्यमातून इराणचे उद्दिष्ट्य साध्य ; चिथावणी दिल्यास मोठ्या कारवाईचा इशारा