सार

इराणने इस्त्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराण असा हल्ला करणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.अखेर इराणने इस्त्रायलवर हल्ला केला असून इराणने चिथावणी दिल्यास मोठ्या कारवाईचा इशारा दिला आहे.

इराणच्या दमास्कस वाणिज्य दूतावासावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बदला म्हणून इराणच्या सैन्याने इस्त्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराण असा हल्ला करणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.रविवारी केलेल्या या हल्ल्यात “त्याची सर्व उद्दिष्टे साध्य झाली आहेत” असे इराणच्या सशस्त्र दलाचे प्रमुख मोहम्मद बागेरी यांनी म्हटले आहे. “मिशन ट्रू प्रॉमिस” काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.असेही बागेरी यांनी वृत्तवाहिनीला सांगितले.

 

इस्रायलवरील हल्ल्याचे उद्दिष्ट पूर्ण :

इराणचे आर्मी चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बागेरी म्हणतात की, हे "मिशन ट्रू प्रॉमिस" हे एक आश्वासन होते. काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला यशस्वीपणे पार पडला. ज्या उद्देशाने इराणने इस्रायलवर हल्ला केला तो उद्देश साध्य झाला आहे, असे ते म्हणाले.

इस्रायलने इराणची सुरक्षा रेषा ओलांडली :

लष्करप्रमुख म्हणाले की, इस्रायलविरोधात ही कारवाई सुरू करणे आवश्यक होते. याचे कारण इस्त्रायली राजवटीने इराणची सुरक्षा रेषा ओलांडली होती. यावेळी आम्हाला असे वाटते की हे ऑपरेशन पूर्ण झाले आहे आणि ते सुरू ठेवण्याची कोणतीही योजना नाही. इराणवर पुन्हा कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर आम्ही आणखी मोठी कारवाई करू. यानंतर दोन्ही बाजूंचा तणाव आणखी वाढेल .

इराणच्या वाणिज्य दूतावासाच्या हल्ल्यात दोन जनरल ठार :

एप्रिलमध्येच सीरियातील इराणी वाणिज्य दूतावास इमारतीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात दोन इराणी जनरल मारले गेले होते.रविवारी सकाळी इराणने 170 ड्रोन, 30 हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि 120 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे इस्रायलने म्हटले आहे. 300 हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.