Donald Trumps 10 Mistakes That Trapped America in an Endless Iran War: अमेरिकेने इराणच्या मोठ्या नेत्यांना संपवण्यासाठी 'क्विक स्ट्राइक' सुरू केला होता. या गोष्टीला आता २२ दिवस उलटून गेले आहेत, पण युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीये. इराणने ४००० किलोमीटर दूर हिंदी महासागरातील अमेरिकेच्या 'दिएगो गार्सिया' तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

Iran vs US War: जगाला वाटलं होतं की 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) सुरू होताच संपेल. अमेरिका आणि इस्रायलने जेव्हा इराणच्या मोठ्या नेत्यांवर आणि लष्करी तळांवर मिसाइलचा वर्षाव केला, तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता गेम ओव्हर. पण आज २२ दिवस उलटून गेले आहेत आणि ही 'क्विक स्ट्राइक' आता एका न संपणाऱ्या युद्धात बदलली आहे. शनिवारी इराणने ४००० किलोमीटर दूर हिंदी महासागरातील अमेरिकेच्या 'दिएगो गार्सिया' तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेने हे मिसाइल मध्येच पाडलं, पण इराणने आपला हेतू साध्य केला. त्याने दाखवून दिलं की अमेरिकेचा कोणताही तळ त्याच्या टप्प्याबाहेर नाही. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की, जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेची चूक कुठे झाली? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कमी लेखलं का? चला, त्या १० मोठ्या चुका समजून घेऊया, ज्यांनी या संपूर्ण युद्धाचा नूरच पालटून टाकला.

1. 'झटपट विजया'चा गैरसमज

अमेरिकेचा प्लॅन होता - 'या, मारा आणि निघा'. त्यांना वाटलं की एका जोरदार हल्ल्याने इराण गुडघे टेकेल. पण इराणने हा हल्ला झेलला आणि लगेच स्वतःला सावरलं. परिणाम? जे युद्ध २-३ दिवसांत संपायला हवं होतं, ते आतापर्यंत लांबलं आहे.

2. नेतृत्व संपवूनही इराण खचला नाही

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी आणि अनेक मोठे कमांडर निशाण्यावर होते. वॉशिंग्टनला वाटलं की यामुळे इराणमध्ये पळापळ होईल. पण झालं उलटं. इराणने लगेच नवीन चेहरे पुढे आणले आणि त्यांची कमांड सिस्टीम पूर्वीसारखीच काम करत राहिली.

3. इराणच्या प्रतिहल्ल्याचा वेग ओळखण्यात चूक

अमेरिकन तज्ज्ञांच्या मते, इराण इतक्या लवकर आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर देईल, याचा अंदाज व्हाईट हाऊसला नव्हता. इराणने केवळ बचावच केला नाही, तर ड्रोन आणि मिसाइलने अमेरिकेचे तळ शोधून-शोधून लक्ष्य करायला सुरुवात केली.

4. तयारीचा प्रचंड अभाव

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हल्ल्यानंतर जो गोंधळ उडणार होता, त्यासाठी अमेरिका पूर्णपणे तयार नव्हती. तज्ज्ञांच्या मते, समुद्रातील मार्ग सुरक्षित ठेवण्यात आणि आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यात जो उशीर झाला, त्याने अमेरिकेची पोलखोल केली.

5. तेल आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचं गणित बिघडलं

सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाने सांगितलं की तेलाच्या किमतींवर काहीही परिणाम होणार नाही. पण जसं इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) जहाजांना धमकावायला सुरुवात केली, तसं जागतिक बाजारात भूकंप आला. आज संपूर्ण जग महागाईच्या भीतीने धास्तावले आहे.

6. बॅकअप प्लॅनच नव्हता

अमेरिकेच्या सिनेटर्सनी स्वतः मान्य केलं की, जर इराणने रस्ता बंद केला, तर तो पुन्हा कसा खुला करायचा याचा सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन (Plan B) नव्हता. कोणताही 'एक्झिट प्लॅन' न ठेवता युद्धात उडी घेणं भारी पडलं.

7. इराणचा हट्टीपणा ट्रम्प ओळखू शकले नाहीत

डोनाल्ड ट्रम्प यांना वाटलं की दबाव टाकल्यावर इराण शरण येईल, पण ते इराणची 'सायकॉलॉजी' समजण्यात चुकले. जेव्हा एखाद्याला भिंतीला टेकवलं जातं, तेव्हा तो घाबरत नाही, उलट जास्त धोकादायकपणे लढतो. इराणनेही तेच केलं.

8. गरजेपेक्षा जास्त आत्मविश्वास

पेंटागॉनच्या काही अधिकाऱ्यांना खात्री होती की इराण खूप मर्यादित प्रत्युत्तर देईल. याच 'ओव्हर कॉन्फिडन्स'मुळे अमेरिकेने आपली पूर्ण ताकद तेव्हा तैनात केली नाही, जेव्हा तिची सर्वात जास्त गरज होती.

9. नेत्यांमध्ये ताळमेळ नाही

युद्धादरम्यान अमेरिकेच्या मोठ्या नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये ताळमेळ दिसला नाही. ट्रम्प म्हणत होते की काम 'पूर्ण' झालं, तर त्यांचे मंत्री वेगळंच लक्ष्य सांगत होते. या गोंधळाचा फायदा इराणने उचलला.

10. दलदलीत अडकली महासत्ता

जे ऑपरेशन एका 'सर्जिकल स्ट्राइक'सारखं सुरू झालं होतं, ते आता अशा दलदलीत बदललं आहे, जिथून बाहेर पडणं अवघड झालं आहे. इराणने स्पष्ट केलं आहे की, एकतर इथे सगळ्यांसाठी शांतता असेल किंवा 'हल्लेखोरांचा' विनाश होईल.