पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' टॉफी भेट दिली, ज्यामुळे सोशल मीडियावर #Melodi ट्रेंड पुन्हा व्हायरल झाला आहे. मेलोनी यांनी स्वतः या भेटीचा व्हिडिओ शेअर केला असून, या गोड राजनैतिक क्षणाची आणि पारले कंपनीच्या प्रतिक्रियेची जगभरात चर्चा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यातील खास मैत्री पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी मोदींनी मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध ‘मेलोडी’ टॉफी भेट दिल्याने इंटरनेटवर #Melodi हा ट्रेंड पुन्हा जोरात व्हायरल झाला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

इटली दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना ‘Melody’ टॉफीचं पॅकेट भेट दिलं. या खास क्षणाचा व्हिडीओ मेलोनी यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केला. “Thank you for the gift” असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आणि काही वेळातच तो लाखो लोकांनी पाहिला. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी मोदी आणि मेलोनी यांच्या नावावरून तयार झालेल्या ‘Melodi’ ट्रेंडची पुन्हा चर्चा सुरू केली. अनेकांनी मजेशीर मीम्स आणि प्रतिक्रिया शेअर करत या क्षणाला “सर्वात गोड राजनैतिक क्षण” असं म्हटलं. काहींनी तर “Parle ला यापेक्षा चांगले ब्रँड अॅम्बेसेडर मिळणार नाहीत” अशाही प्रतिक्रिया दिल्या.

पारले कंपनीने काय म्हटलं? 

दरम्यान, या व्हायरल क्षणानंतर Parle कंपनीनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. “Sweetening relationships since 1983” असं म्हणत कंपनीने मोदी-मेलोनी यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेमुळे भारतीय ब्रँडला जागतिक स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळाल्याचं म्हटलं आहे. मोदी आणि मेलोनी यांची मैत्री याआधीही अनेकदा चर्चेत आली आहे. G20 आणि इतर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये दोन्ही नेत्यांचे सेल्फी आणि अनौपचारिक संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे आता ‘Melody’ टॉफीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोघांची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे.

ट्रेंडिंगमध्ये काय आहे? 

या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर #Melodi हा हॅशटॅग पुन्हा ट्रेंडिंगमध्ये आला आहे. राजनैतिक भेटीतला हा हलकाफुलका क्षण जगभरातील नेटिझन्सना आवडला असून भारत-इटली संबंधांमध्ये गोडवा वाढल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहेत.