China Earthquake : चीनमधील Gansu मध्ये 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, 111 जणांचा मृत्यू तर 230 जखमी

| Published : Dec 19 2023, 10:55 AM IST / Updated: Dec 26 2023, 12:49 PM IST

China earthquake

सार

China : चीनमधील गानसू (Gansu) येथे 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले गेले. यामुळे 111 नागरिकांचा मृत्यू झाला असून 230 जण जखमी झाले आहेत.

China Earthquake : चीनमधील गानसू येथे 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले गेले. भूकंपाचे झटके ऐवढे तीव्र होते की, यामुळे 111 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 230 जण जखमी झाले आहेत. भूकंप मंगळवारी (19 डिसेंबर, 2023) गानसू-किंघई सीमाक्षेत्रात (Gansu-Qinghai Border Area) झाल्याचे सांगितले जात आहे.

युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल असल्याचे मोजले होते. पण चीनच्या शासकीय मीडियाने म्हटले की, भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल होती. चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राच्या मते, भूकंप सोमवारी (18 डिसेंबर, 2023) रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी झाला. 

भूकंपाचे केंद्र गानसू प्रांताची राजधानी लान्झूपासून (Lanzhou) 102 किमी अंतरावरील पश्चिम-दक्षिण पश्चिमेला होता. भूकंपानंतर एखादा नागरिक बेपत्ता झाला आहे की नाही हे अधिकृत रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेले नाही.

आपत्कालीन व्यवस्था
चीनच्या अधिकृत शिन्हुआ वृत्त संस्थेने (Xinhua News Agency) म्हटले की, भूकंपाचा केंद्रबिंदू दोन उत्तर-पश्चिम प्रांतांच्या सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर होता. त्यानंतर किंघई प्रांतातील काही ठिकाणी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपानंतर बचाव कार्यासाठी चीनच्या राष्ट्रीय आयोग आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने स्तर-IV ची आपत्कालीन व्यवस्था लागू केली आहे.

शून्यापेक्षा 14 डिग्री सेल्सिअसखाली होते तापमान
भूकंप ज्या ठिकाणी झाला तो उंच डोंगराळ भाग असून तेथील वातावरण थंड असते. गानसूच्या लिनक्सियामध्ये भूकंपानंतर फार मोठे नुकसान झाले आहे. येथे मंगळवारी (19 डिसेंबर, 2023) सकाळी तापमान शून्यापेक्षा 10 डिग्री सेल्सिअसखाली होते. गेल्या आठवड्यापासून येथे थंड वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. भूकंपामुळे पाणी, वीज, रस्त्यांसह अन्य पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. भूकंपग्रस्त ठिकाणी मदतकार्य सुरू आहे.

आणखी वाचा: 

महिलेच्या डोळ्यातून काढले 60 जिवंत किडे, डॉक्टरांनाही बसला धक्का

सॉफ्ट ड्रिंक-दारूमुळे वर्षाला तब्बल 1 कोटी लोकांचा होतोय मृत्यू, WHOने केले मोठे विधान

US Shooting : लास वेगासमध्ये विद्यापीठात गोळीबार, तिघांचा मृत्यू - एकजण जखमी