सार
बांग्लादेश सरकार इस्कॉनवर बंदी घालण्याच्या विचारात आहे. इस्कॉनला 'धार्मिक कट्टरपंथी संघटना' म्हणून संबोधत सरकारने कोर्टात बंदीची मागणी केली आहे. हिंदू नेता चिन्मॉय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर आंदोलने वाढली असून, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत आहे.
ढाका: बांग्लादेशचे सरकार इस्कॉनवर (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस) बंदी घालण्याच्या तयारीत आहे. सरकारने कोर्टात इस्कॉनचा 'धार्मिक कट्टकपंथी संघटना'असा उल्लेख केला आहे आणि संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बांग्लादेशातील कट्टरपंथी इस्लामी संघटना इस्कॉन आणि अन्य हिंदू मंदिरांना निशाना बनवत आहेत.काही दिवसांपुर्वी हिंदू नेता चिन्मॉय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना अटक केली आहे. यामुळे संपूर्ण बांग्लादेशात व्यापक विरोधी आंदोलन झाले आहेत.
आंदोलनाला दाबण्यासाठी बांग्लादेशच्या सरकारने इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी कोर्टात केली आहे. बुधवारी एका वकीलाने इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करताना हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
अटॉर्नी जनरल कोर्टात म्हणाले इस्कॉन ही धार्मिक कट्टरपंथी संघटना आहे
सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने अटॉर्नी जनरला इस्कॉन विषयी विचारणा केली. बांग्लादेशात इस्कॉनची स्थापन कशी झाली हे विचारले.तेव्हा अटॉर्नी जनरल मोहम्मद असदुज्मा म्हणाले की,"ही संघटना राजकीय पक्ष नसुन एक धार्मिक कट्टरपंथी संगठन आहे. सरकार आधीच याची चौकशी करत आहे."
हायकोर्टाने अटॉर्नी जनरल यांना निर्देश दिले की इस्कॉन आणि देशातील सम्रग कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर गुरूवारी सकाळपर्यंत रिपोर्ट द्यावा. कोर्टाने सरकारला कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे निर्देश दिले आहेत.
शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर हिंदूंवर वाढले अत्याचार
५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांचे आवामी लीग सरकार पडले होते. यानंतर बांग्लादेशात हिंदूंच्याविरोधात अत्याचार वाढले आहेत. काही दिवसांपु्र्वी हिंदू नेता चिन्मॉय दास यांना अटक केली गेली. ते आधी इस्कॉनचे सदस्य होते.त्यांच्यावर या आठवड्याच्या सुरुवातीला हिंदू समाजाच्या एका रॅलीत राष्ट्रीय ध्वजाचा कथित अपमान केल्याचा आरोप लावला गेला आहे.
भारत सरकारने चिन्मॉय दास यांची अटक आणि त्यांना जामीन न दिल्या जाण्याचा विरोध केला आहे. याचबरोबर बांग्लादेशच्या सरकारला अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा-
पाकमध्ये इम्रान खान समर्थकांचा उद्रेक, निषेधांमुळे हाहाकार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान जेटची झलक, नातीने शेअर केला व्हिडीओ