MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Thailand Tigers : थायलंडमध्ये 72 वाघांचा मृत्यू, फोटोजेनिक वाघच दगावल्याने पर्यटकांची नाराजी!

Thailand Tigers : थायलंडमध्ये 72 वाघांचा मृत्यू, फोटोजेनिक वाघच दगावल्याने पर्यटकांची नाराजी!

Thailand Tigers : थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांसाठी वाघ हे मोठं आकर्षण आहे. पण ज्या वाघांना पर्यटक हात लावू शकत होते, त्यांच्यासोबत फोटो काढू शकत होते, अशा ७२ वाघांचा एका खतरनाक व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. 

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Feb 26 2026, 10:05 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
चियांग माईमधील टायगर पार्क
Image Credit : Getty

चियांग माईमधील टायगर पार्क

थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या चियांग माईमधील एका टायगर पार्कमध्ये ही घटना घडली. ८ ते १८ फेब्रुवारी दरम्यान पार्काच्या दोन शाखांमध्ये मिळून ७२ वाघांचा मृत्यू झाला. यातले बहुतेक बछडे दोन आठवड्यांपेक्षा कमी वयाचे होते. प्रशासनाने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
29
पर्यटकांचे खास आकर्षण
Image Credit : Getty

पर्यटकांचे खास आकर्षण

या पार्कमध्ये पर्यटक वाघांना हात लावू शकत होते आणि त्यांच्यासोबत फोटोही काढू शकत होते. 'टायगर किंगडम चियांग माई' (Tiger Kingdom Chiang Mai) या नावाने हे वाघ ओळखले जात. या पार्काच्या दोन केंद्रांमध्ये २४० पेक्षा जास्त वाघ होते.

Related Articles

Related image1
New 7 Seater Family Cars : दोन नवीन 7-सीटर गाड्या बाजारात दाखल, तेही चक्क आकर्षक किंमतीत, कुटुंबांसाठी लॉटरीच
Related image2
Top Camera Phones: प्रीमियम बेस्ट कॅमेरा फोन्स आता तुमच्याही बजेटमध्ये
39
मृत्यूचं कारण 'कॅनाइन डिस्टेंपर'
Image Credit : Getty

मृत्यूचं कारण 'कॅनाइन डिस्टेंपर'

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत 'कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस' (Canine Distemper Virus) मुळे वाघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. नमुन्यांमध्ये फुफ्फुसाच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियाचा अंशही आढळला.
49
माणसांना धोका नाही!
Image Credit : Getty

माणसांना धोका नाही!

हा आजार माणसांमध्ये पसरत नाही, त्यामुळे पर्यटकांनी घाबरण्याची गरज नाही, असं अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. या आजाराचा प्रसार कसा झाला, हे मात्र अजून निश्चित झालेलं नाही.
59
आजारावर नियंत्रण मिळवलं
Image Credit : Getty

आजारावर नियंत्रण मिळवलं

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आता व्हायरसचा प्रसार थांबला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. नवीन मृत्यूची नोंद नाही. मृत वाघांचे अवशेष पूर्णपणे पुरण्यात आले आहेत. गंभीर आजारी वाघांना दयामरण देण्याची शिफारस केली आहे.
69
काय आहे कॅनाइन डिस्टेंपर?
Image Credit : Getty

काय आहे कॅनाइन डिस्टेंपर?

कॅनाइन डिस्टेंपर हा वेगाने पसरणारा एक जीवघेणा आजार आहे. हा विषाणू प्राण्यांच्या श्वसन, पचन आणि मज्जासंस्थेवर हल्ला करतो. सामान्यतः हा आजार कुत्र्यांमध्ये आढळतो, पण वाघ आणि सिंहांनाही याची लागण होऊ शकते.
79
दूषित चिकनमुळे संसर्ग?
Image Credit : Getty

दूषित चिकनमुळे संसर्ग?

बँकॉक पोस्टच्या वृत्तानुसार, वाघांना दिलेल्या दूषित चिकनमधून हा आजार पसरल्याचा संशय आहे. २००४ मध्ये चोनबुरी प्रांतातील एका टायगर झूमध्ये बर्ड फ्लू पसरण्यामागेही कच्चे चिकन हेच कारण असल्याचा संशय होता. तेव्हा सुमारे १५० वाघ मरण पावले होते.
89
पार्क तात्पुरते बंद
Image Credit : Getty

पार्क तात्पुरते बंद

रोग नियंत्रण विभागाने (Disease Control Department) सांगितलं की, केंद्रातील डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांना संसर्ग झालेला नाही. तरीही, खबरदारी म्हणून त्यांना २१ दिवस निरीक्षणाखाली ठेवलं आहे. 'टायगर किंगडम चियांग माई' पार्क सध्या दोन आठवड्यांसाठी बंद आहे.
99
चिंतेचं कारण नाही - अधिकारी
Image Credit : Getty

चिंतेचं कारण नाही - अधिकारी

वाघांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झालेला नाही आणि हा विषाणू माणसांना संक्रमित करत नाही, त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. प्राण्यांकडून माणसात संसर्ग झाल्याची एकही केस नाही, असं सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
जागतिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
White House Shooting : व्हाइट हाऊसजवळ गोळीबार, २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू; कोण होता हा हल्लेखोर नासिर बेस्ट?
Recommended image2
Ivanka Trump : इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उधळला? इराणसमर्थक दहशतवादी अटकेत; अमेरिकेत खळबळ
Recommended image3
मोदी-मेलोनींचा ‘मेलोडी’ मोमेंट पुन्हा व्हायरल; सोशल मीडियावर दिली भन्नाट प्रतिक्रिया
Recommended image4
इराण कराराच्या तयारीत? ट्रम्प यांचा मोठा दावा; तेल बाजार घसरण्याची शक्यता
Recommended image5
PM Modi in Sweden : युरोपच्या टॉप CEOsना मोदींनी घातली गळ, आता चीनचं काय होणार?
Related Stories
Recommended image1
New 7 Seater Family Cars : दोन नवीन 7-सीटर गाड्या बाजारात दाखल, तेही चक्क आकर्षक किंमतीत, कुटुंबांसाठी लॉटरीच
Recommended image2
Top Camera Phones: प्रीमियम बेस्ट कॅमेरा फोन्स आता तुमच्याही बजेटमध्ये
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved