सार

Argentina President Javier Milei : अर्जेंटिनेचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी पुन्हा एकदा गर्लफ्रेंड फातिमाचे सर्वांसमोर चुंबन घेतले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Argentina President Javier Milei : अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीमध्ये जेवियर मिले यांनी हजेरी लावली होती. यावेळेस जेवियर यांनी स्टेजवर सर्वांसमोरच गर्लफ्रेंड फातिमा फ्लोरेजचे चुंबन घेतले. गर्लफ्रेंडला किस करतानाचा त्यांचा हा व्हिडीओ आता जगभरात व्हायरल होत आहे.

गर्लफ्रेंड फातिमाच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये जेवियर मिले सहभागी झाले होते. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9.40 वाजण्याच्या सुमारास म्युझिक कॉन्सर्टसाठी रॉक्सी थिएटरमध्ये पोहोचले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता राष्ट्राध्यक्षांनी स्वतः तिकिटाची रक्कम भरल्याचेही म्हटले जात आहे.

स्टेजवर पोहोचले आणि गर्लफ्रेंडला केले किस

जेवियर मिले गर्लफ्रेंड फातिमा फ्लोरेजच्या म्युझिक कॉन्सर्टमधील स्टेजवर पोहोचले. स्टेजवर दाखल झाल्यानंतर आधी भाषण केले आणि त्यानंतर सर्वांसमोर फातिमाला किस केले. 

जेवियर मिले यांची गर्लफ्रेंड फातिमा एक प्रसिद्ध कॉमेडियन आहे. पतीशी घटस्फोट झाल्यानंतर तिची अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मिले यांच्यासोबत भेट झाली. या दोघांचीही ओळख इंस्टाग्रामवर झाली आणि यानंतर हळूहळू भेटीगाठी वाढू लागल्या. एका टीव्ही शोदरम्यान दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली होती.

यापूर्वीही सार्वजनिक ठिकाणी केले होते किस

राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी यापूर्वीही गर्लफ्रेंड फातिमाला सार्वजनिक ठिकाणी किस केले आहे. न्यू ईअर सेलिब्रेशन पार्टीपूर्वीही या दोघांनी भर कार्यक्रमात एकमेकांना किस केले होते. नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जेवियर यांनी थेट टेलिव्हिजनवरच गर्लफ्रेंडचे चुंबन घेतले होते.

आणखी वाचा : 

Earthquake in Japan : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप, त्सुनामीचाही इशारा

विमानात गर्भवतीसोबत सीट बदलण्यास त्याने दिला नकार, टीकेऐवजी नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा

US Crime : कोण आहे प्रियंका तिवारी? जिने अमेरिकेत स्वतःच्याच 10 वर्षीय मुलाची केली हत्या, कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह