US Crime : कोण आहे प्रियंका तिवारी? जिने अमेरिकेत स्वतःच्याच 10 वर्षीय मुलाची केली हत्या, कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

| Published : Dec 25 2023, 01:37 PM IST / Updated: Dec 25 2023, 01:42 PM IST

crime
US Crime : कोण आहे प्रियंका तिवारी? जिने अमेरिकेत स्वतःच्याच 10 वर्षीय मुलाची केली हत्या, कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

US Crime : अमेरिकेतील कॅरोलिना परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. येथील प्रियंका तिवारी नावाच्या भारतीय महिलेला तिच्याच मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Priyanka Tiwari News : अमेरिकेतील कॅरोलिना परिसरात वास्तव्यास असणाऱ्या प्रियंका तिवारी नावाच्या महिलेवर आपल्याच 10 वर्षीय मुलाची हत्या केल्याचा गंभीर आहे. या महिलेच्या राहत्या घरात तिच्या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. 

सध्या पोलीस अधिकार्‍यांनी महिलेला अटक केली आहे आणि हत्येसह बाल अत्याचाराचा गुन्हा देखील तिच्यावर दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने आपल्या मुलाची केवळ हत्याच केली नव्हे तर त्याचा मृतदेह घरात कुजत ठेवला.

महिलाने स्वतःच दिली पोलिसांना माहिती

अमेरिकेतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय प्रियंका तिवारीने 911 या क्रमांकावर कॉल करून आपला मुलगा प्रतिसाद देत नसल्याची तक्रार केली. यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्याला सीपीआर देण्यात आला. पण मुलाच्या शरीराची कोणत्याही प्रकारे हालचाल दिसत नव्हती.

यावेळेस पोलिसांच्या निदर्शनास आले की, काही दिवसांपूर्वीच मुलाही हत्या करण्यात आली आहे आणि त्याचा मृतदेह कुजू देखील लागला होता. घटनास्थळी पोलीस अधिकार्‍यांना घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ देखील सापडले.

पण धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू होण्यापूर्वी मुलाच्या शरीराचे कित्येक किलो वजन घटले होते. याचा अर्थ त्याला खाण्यापिण्यास काहीही दिले जात नव्हते, हे देखील पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेने हे कृत्य जाणूनबुजून केले, ज्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. मात्र महिलेने अशा पद्धतीने मुलाचा छळ का केला असावा? याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आरोपी महिलेला अटक

पोलिसांनी मृत पावलेल्या मुलाची आई प्रियंका तिवारीला बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील नातेवाईक कित्येक दिवसांपासून फोन करत होते, पण या महिलेने एकाही कॉलला उत्तर दिले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार महिलेला जवळपास आठ फोन आले होते.

अशीही माहिती समोर येत आहे की, मृत पावलेला मुलगा एकाकी पडला होता. त्यांच्या नातेवाईकांनीही तिवारी कुटुंबाची कित्येक दिवसांपासून भेट घेतली नव्हती. शेजाऱ्यांनी देखील हीच माहिती पोलिसांना दिली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी कुटुंबाकडून अशा घटनेची अपेक्षा केली नव्हती कारण प्रत्येकजण अतिशय मनमिळाऊ होते.

आणखी वाचा

Dawood Ibrahim : मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेबाबत मोठा निर्णय, या दिवशी होणार लिलाव

Thane Crime : पतीने संशयातून पत्नीसह मुलांची केली निर्घृण हत्या, तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं

एकतर्फी प्रेमातून तरुणीची भररस्त्यात हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आईची मागणी