सार

विमानामध्ये कोणत्या-न्-कोणत्या कारणांवरून प्रवाशांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. एका पुरुषाने गर्भवती महिलेला आपली सीट देण्यास नकार दिला, कारण…

Airplane Seats Swap News : सोशल मीडियापासून आजकाल कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही. सेकंदानुसार प्रत्येक गोष्टीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपडेट होत असतात. सध्या सोशल मीडियावर विमानामध्ये गर्भवती महिला व एका पुरुषामध्ये झालेल्या वादाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

एका व्यक्तीने विमान प्रवासादरम्यान त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, विमानाने प्रवास करत असताना एका गर्भवती महिलेने त्याच्यासोबत सीट बदलण्याची मागणी केली. या महिलेला वॉशरूमच्या जवळ असणारी सीट हवी होती. पण सीट बदलण्यास त्याने नकार दिला. 

सहसा अशा परिस्थितीत युजर्संनी कोणावरही सडकून टीका केली असती, पण या व्यक्तीच्या बाबतीत सोशल मीडियावर थोडे वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. नेटकरी या व्यक्तीला आपला पाठिंबा दर्शवत आहेत.

विमानात नेमके काय घडले?

सोशल मीडियावर पोस्ट करत त्या व्यक्तीने म्हटले की, गर्भवती महिलेने वॉशरूमच्या जवळ असणारी सीट मागितली. यावर तिला, मी स्वतः काही वैद्यकीय समस्यांचा सामना करत असल्याची व या सीटसाठी अतिरिक्त शुल्क देखील भरल्याचे सांगितले. त्यामुळे अशा परिस्थिती सीटची अदलाबदल करू शकत नाही, असेही सांगितले. 

पुढे त्यानं असेही नमूद केले की, गर्भवती महिलेची स्थिती पाहता सीटची अदलाबदल करण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नव्हते.

क्रू मेंबर्सकडून मध्यस्थी करण्यास नकार

आपल्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीने लिहिले आहे की, सीटची अदलाबदल करण्यास नकार दिल्यानंतर ती महिला माझ्याशी वाद घालून उद्धटपणे बोलत होती. मला माझ्या जागेवरून हलवावे, यासाठी तिने क्रू मेंबर्सकडेही मागणी केली. पण त्यांनी मध्यस्थी करण्यास नकार दिला.

नेटकऱ्यांनी दर्शवला पाठिंबा

या व्यक्तीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्संकडून त्याला पाठिंबा दर्शवण्यात आला. युजर्स म्हणताहेत की, जर तो व्यक्तीच वैद्यकीय समस्यांचा सामना करत असेल, तर सीट कशी बदलून देऊ शकतो. सीटसाठी त्याने अतिरिक्त शुल्क देखील दिले होते. जर त्याने सीटची अदलाबदल केली असती तर एअरलाइन्स कंपनीने त्याला अतिरिक्त शुल्क परत केले असते का? युजर्सकडून एअरलाइन्स कंपनीवरही नाराजी व्यक्त करण्यात आली.

आणखी वाचा :

महिलेच्या डोळ्यातून काढले 60 जिवंत किडे, डॉक्टरांनाही बसला धक्का

US Crime : कोण आहे प्रियंका तिवारी? जिने अमेरिकेत स्वतःच्याच 10 वर्षीय मुलाची केली हत्या, कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

Dawood Ibrahim : मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेबाबत मोठा निर्णय, या दिवशी होणार लिलाव