Layoffs in Argentina : अर्जेंटिनामध्ये 70 हजार शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, राष्ट्रध्यक्ष जेव्हियर माइली यांचे संकेत

| Published : Mar 27 2024, 12:58 PM IST / Updated: Mar 27 2024, 01:01 PM IST

president javier milei argentina

सार

अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हियर माइली यांनी 70 हजार जणांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. असे म्हटले जातेय की, नोकऱ्या गेल्यास राष्ट्राध्यक्षांना श्रमिक संघाचा मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागू शकतो.

Layoffs in Argentina : ब्लूमबर्गच्या एका रिपोर्ट्सनुसार, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हियर माइली (President Javier Milei) यांनी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये 70 हजार शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. खरंतर, हा अर्जेंटिनाच्या 3.5 दशलक्ष सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा एक लहान हिस्सा आहे. तरीही माइली यांना श्रमिक संघाच्या विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

70 हजार नागरिकांना सोडावे लागणार नोकरीवर पाणी
मंगळवारी (26 मार्च) एका भाषणात अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष माइली यांनी म्हटले की, राज्यातील कर्मचाऱ्यांचे 70 हजार कॉन्ट्रॅक्ट संपणार आहेत. यावेळी राष्ट्राध्यक्ष ब्यूनसर आयर्समध्ये इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरम ऑफ अमेरिकेद्वारे आयोजित केलेल्या एका संम्मेलनात बोलत होते.

50 कर्मचाऱ्यांना आधीच नोकऱ्या गेल्यात
माइली यांनी बुधवारी (27 मार्च) ब्यूनसर आयर्सच्या फोर सीझन्स हॉटेलमधील कॉन्फ्रेन्सवेळी म्हटले की, “आम्ही 50 हजार सार्वजनिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. नोकरीचे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर लक्षात असू द्या तुमचे पुढेही कंपनीसोबतचे संबंध संपत आहेत. याशिवाय 70 हजार जणांच्याही नोकऱ्या जाणार आहेत.”

कामगार संघटनांचे आंदोलन सुरू
याआधी मंगळवारी सार्वजनिक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांच्या एक असोसिएशनने नोकऱ्या जाणार असल्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. अर्जेंटिनामध्ये 31 मार्चपर्यंत 70 हजार नोकऱ्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये ह्युमन कॅपिटल, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अ‍ॅण्ड इकोनॉमी, सोशल सिक्युरिटी एजेंसी, एनर्जी सेक्रिटेरियट आणि अन्य क्षेत्रासंबंधित आहे.

आणखी वाचा : 

UK : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीदरम्यान भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणाच्या विरोधात द्वेश मोहीम सुरू, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने आपल्या जगभरातील नागरिकांसाठी जारी केला अ‍ॅलर्ट, दिल्यात या सूचना

मुलाने आपल्या 72 वर्षांच्या वडिलांसोबत या देशाच्या PM पंगा घेतला, डीपफेकद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण…

Related Stories