मुलाने आपल्या 72 वर्षांच्या वडिलांसोबत या देशाच्या PM पंगा घेतला, डीपफेकद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण...

| Published : Mar 21 2024, 10:57 AM IST / Updated: Mar 21 2024, 11:54 AM IST

giorgia meloni

सार

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे डीपफेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्यात आले होते. या प्रकरणात जॉर्जिया मेलोनी यांनी नुकसान भरपाईची मागितली आहे.

Deepfake Videos : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Italy Prime Minister Giorgia Meloni) यांनी डीपफेक व्हिडीओ प्रकरणात नुकसान भरपाई मागितली आहे. 40 वर्षीय आरोपीने त्याच्या 73 वर्षीय वडिलांसोबत मिळून जॉर्जिया मेलोनी यांचा व्हिडीओ अमेरिकेतील अडल्ट कंटेट वेबसाइटवर पोस्ट केला होता.

बीबीसीनुसार, आरोपींनी जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान होण्याआधी म्हणजेच वर्ष 2022 मध्ये डीपफेक व्हिडीओ तयार केला होता. यामध्ये अडल्ट फिल्म स्टारच्या चेहऱ्यावर जॉर्जिया यांचा चेहरा लावला होता. दोन्ही आरोपींच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.

मोबाइलच्या माध्यमातून आरोपींपर्यंत पोहचल्या जॉर्जिया मेलोनी
जॉर्जिया मेलोनी यांनी 1 लाख युरो म्हणजेच 90 लाख रुपये नुकसान भरपाई मागितली आहे. या प्रकरणात जॉर्जिया मेलोनी ससारी कोर्टात 2 जुलै रोजी कोर्टात साक्ष देणार आहेत. बीबीसीच्या रिपोर्ट्सनुसार म्हटले की, कथित अडल्ट व्हिडीओ अपलोड करण्यासाठी वापर करण्यात आलेल्या मोबाइलच्या माध्यमातून पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले होते.

नुकसान भरपाईची रक्कम दान करणार जॉर्जिया मेलोनी
जॉर्जिया मेलोनी यांचे वकील मारिया गिउलिया मारोंगिउ यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी नुकसान भरपाई मागितली आहे. या नुकसान भरपाई मागण्यामागील उद्देश म्हणजे, डीपफेकच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांनी या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठवण्यापासून घाबरू नये. नुकसान भरपाई मिळाल्यास डीपफेकच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना ती दान केली जाणार आहे.

दरम्यान मेलोनी यांची टीमकडून जारी करण्यात आलेल्या विधानानुसार, वर्ष 2022 मध्ये अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओ लाखो नागरिकांनी पाहिला आहे. इटलीच्या कायद्यानुसार, काही मानहानीच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

आणखी वाचा :

US Election : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा ओहायोमध्ये प्राथमिक निवडणुकीत विजय

अमेरिकेच्या H-1B व्हिसाच्या रजिस्ट्रेशनसाठी 22 मार्चपर्यंत मूदत, ऑनलाइन अर्जासाठी ही कागदपत्रे सादर करावी लागणार

'हातात तलवार...भारताविरोधात घोषणा', खलिस्तान्यांकडून कॅनडा दौऱ्यावर आलेल्या भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांचा विरोध

 

 

Related Stories
Top Stories