UK : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीदरम्यान भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणाच्या विरोधात द्वेश मोहीम सुरू, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

| Published : Mar 27 2024, 10:40 AM IST / Updated: Mar 27 2024, 10:46 AM IST

Styam Surana
UK : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीदरम्यान भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणाच्या विरोधात द्वेश मोहीम सुरू, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका होत आहेत. यासाठी भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणा उभा राहिला असून त्याच्या विरोधात द्वेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.

UK : लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये (London School of Economics) विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका सुरू आहेत. यासाठी सत्यम सुराणा (Satyam Surana) उभा राहिला आहे. विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या 12 तास आधीच एक सुनियोजित पद्धतीने सत्यम सुराणाच्या विरोधात एक अभियानही सुरू करण्यात आले आहे. याशिवाय सत्यम सुराणाला भाजपशी जोडले गेले आहे. सत्यमला फॅसिस्ट (Fascist) असल्याचे म्हणत त्याच्या विरोधात ‘द्वेष अभियान’ सुरू करण्यात आली आहे.

सत्यम सुराणा भारतीय विद्यार्थी असून त्याने गेल्या वर्षात ब्रिटेनमधील भारतीय उच्चायोगावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आव्हान देत रस्त्यांवर तिरंगा फडकवला होता.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुराणाचा जन्म पुण्यातील आहे. सुराणाने काही महिने बॉम्बे हायकोर्टात प्रॅक्टिस केली. यानंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये एलएलएमच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या वर्षात सुराणा याचे एलएलएमचे शिक्षण पूर्ण होणार आहे.

सत्यम सुराणाचा पुण्यातील जन्म 
रिपोर्ट्सनुसार, सत्यम सुराणाचा जन्म पुण्यातील आहे. सुराणाने काही महिने बॉम्बे हायकोर्टात प्रॅक्टिस केली. यानंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये एलएलएमच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या वर्षात सुराणा याचे एलएलएमचे शिक्षण पूर्ण होणार आहे.

माझे पोस्टर फाडले जातायत- सत्यम सुराणा
घटनेसंदर्भात माहिती देत सत्यम सुराणाने म्हटले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या सुरूवातीला एलएसई निवडणुक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी सरचिटणीस पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. 14-15 मार्चवेळी माझे पोस्टर फाडले गेले. याबद्दल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोस्टर बदलण्यात आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर फुल्लीची निशाणी करण्यात आली होती.

दरम्यान, 17 मार्चला दुपारी एलएसईमधील सर्व ग्रुप्ससाठई एक मेसेज देण्यात आला होता. या मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता की, सत्यम भाजप समर्थक आहे. तो फॅसिस्ट व्यक्ती आहे. तो इस्लामोफोबिक, ट्रांसफोबिक आहे.

सत्यमच्या विजयाची शक्यता कमी
सत्यमने म्हटले की, माझ्या घोषणापत्रात कोणताही राजकीय मुद्दा नव्हता. माझ्याकडे केवळ परिसरातील वास्तविक मुद्दे होते. सुरूवातीला मला उत्तम पाठिंबा मिळाला. पण आता सर्व गोष्टी माझ्या वियजाविरोधात घडल्या आहेत. मी सर्व टीमसोबत प्रत्येक विभागात गेलो होतो. मी संपूर्ण परिसरात फिरलो. माझ्या घोषणापत्रात म्हटले होते की, कोणत्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. जसे की, एलएसई परिसरात सब्सिडीच्या भोजनाची व्यवस्था, तक्रार निवारण पोर्टलची आवश्यकता. आम्हाला पाठिंबा दिला जात होता आणि मतही देऊ असे म्हणत होते. पण आता माझ्या संपूर्ण टीमला टार्गेट केल्याचे सत्यम सुराणा याने म्हटले आहे.