सार

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये नुकताच झालेल्या दहशतावादी हल्ल्यामुळे अमेरिकेकडून आपल्या नागरिकांसाठी अ‍ॅलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Moscow Attack : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमीही झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनने (Islamic State) घेतली. अशातच अमेरिकेने (US) देशभारत आपल्या नागरिकांसाठी अ‍ॅलर्ट जारी केला आहे. याशिवाय सध्याच्या तणावाच्या स्थितीत नागरिकांनी काय करावे आणि काय करू नयेत याबद्दलच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जगभरात वाढता तणाव, अमेरिकेतील नागरिकांची आंदोलने आणि काही मागण्यांवरून केल्या जाणाऱ्या विरोधासंबंधित अशाप्रकारचे दहशतवादी हल्ले होत असल्याची भीती व्यक्त करत नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत. 

अमेरिकेने नागरिकांना दिल्यात या सूचना

  • पर्यटकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे.
  • स्मार्ट ट्रॅव्हलर एनरोलमंट प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करावे. जेणेकरुन वेळोवेळी सूचना आणि अ‍ॅलर्ट मिळत राहिल. याशिवाय तुम्ही परदेशात असलात तरीही शोधता येईल.
  • सर्व अमेरिकेच्या नागरिकांनी देशाच्या फेसबुक आणि ट्विटवर जारी केलेल्या गाइडलाइन्स फॉलो कराव्यात.

फ्रान्समध्येही अमेरिकेच्या दूतवासाने जारी केला अ‍ॅलर्ट
फ्रान्समध्येही (France) अमेरिकेच्या दूतवासाने दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या नागरिकांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यामध्ये म्हटलेय की, अमेरिकेच्या हिसासंबंधित केली जाणारी आंदोलने पाहता वाढत असलेल्या हल्ल्यांपासून सावध राहा. शक्य असल्यास घराबाहेर विनाकारण पडू नका. अधिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

फ्रान्सच्या पंतप्रधानांची ट्विटरवर पोस्ट
फ्रान्सचे पंतप्रधान गॅब्रिएल अटल (Gabriel Attal) यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नागरिकांना सूचना देण्यासह मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशात धोका निर्माण होऊ शकतो. ग्रॅबिएल अटल यांनी म्हटले की, अधिकाऱ्यांच्या मते इस्लामिक स्टेटकडून दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी मॉस्कोमधील हल्ल्यानंतर तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही खास निर्णय घेतले जाणार आहेत.

आणखी वाचा : 

खलिस्तानींनी आम आदमी पक्षाला 16 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला, भुल्लरच्याही सुटकेची ऑफर केल्याचा दहशतवादी पन्नूनचा दावा (Watch Video)

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू

Moscow Attack : मॉस्को हल्ल्यातील तीन आरोपींना कबुल केला गुन्हा, सैन्याने केलेल्या अत्याचाराचाही कोर्टात वाचला पाढा