फ्रान्समध्ये अडकलेले विमान मुंबईत दाखल, 276 प्रवासी परतले

| Published : Dec 26 2023, 09:54 AM IST / Updated: Dec 26 2023, 12:35 PM IST

Indian return from france

सार

निकाराग्वा (Nicaragua) येथून भारताच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या विमानाला फ्रान्समध्ये अडवण्यात आले होते. मानवी तस्करीच्या आरोपावरून विमानातील प्रवाशांची दोन दिवस चौकशी करण्यात आली. यामध्ये बहुतांशजण हे भारतीय नागरिक होते.

Mumbai : फ्रान्समध्ये मानवी तस्करीच्या (Human Trafficking) आरोपाखाली अडवणूक करण्यात आलेले विमान आता मुंबईत परतले आहे. फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मते, या विमानात 300च्या आसपास प्रवासी होते. त्यापैकी 276 प्रवाशांना घेऊन विमान मुंबईत परतले आहे.

तसेच दोन अल्पवयीन मुलांसह 25 प्रवासी अद्याप फ्रान्समध्येच आहेत. फ्रान्समध्ये असलेल्या या प्रवाशांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

विमान मुंबईत दाखल
रिपोर्ट्सनुसार, एअरक्राफ्ट एअरबस ए340 मंगळवारी (26 डिसेंबर, 2023) पहाटे चार वाजता मुंबईत दाखल झाले. अधिकाऱ्यांनी म्हटले की, हे विमान फ्रान्समधील व्हॅट्री विमानताळावरून (Vatry Airport) तेथील स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी भारताच्या दिशेने रवाना झाले होते.

फ्रान्समधील वृत्त वाहिनीनुसार हे प्रकरण आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीसंबंधित आहे असे म्हटले होते. फ्रेंच अधिकाऱ्यांनी म्हटले की, जेव्हा विमानाची अडवणूक करण्यात आली त्यावेळी यामध्ये 303 प्रवासी होते.

या कारणास्तव अडवले होते विमान
निकाराग्वा येथून जवळजवळ 303च्या आसपास नागरिकांना घेऊन एअरबस ए340 ने उड्डाण केले होते. यामध्ये बहुतांशजण भारतीय नागरिकच होते. भारतीय दूतावासानुसार मानवी तस्करीचे इनपुट मिळाल्यानंतर विमान फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावर थांबवण्यात आले होते.

यानंतर भारतीयांची दोन दिवस चौकशी करण्यात आली. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, फ्रान्सच्या कोर्टाने चौकशी केल्यानंतर विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी दिली गेली. ज्या विमानात भारतीय नागरिक होते ते रोमानियन कंपनी 'लेजेंड एअरलाइन्स' यांच्याद्वारे संचलित केले जाते.

आणखी वाचा: 

मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्या विरोधात FIR दाखल, पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप

Savitri Jindal : देशातील सर्वात श्रीमंत महिला, कमाईमध्ये अंबानी-अदानींनाही सोडले मागे

काय सांगता! चक्क राम मंदिराच्या थीमवर आधारित तयार केलाय नेकलेस, पाहा VIDEO