Career Tips : नोकरी मिळाल्यानंतर पगार मागताना लक्षात ठेवा या 5 गोष्टी
नोकरी मिळाल्यावर पगार वाढवण्यासाठी काय करावे असा प्रश्न पडतोय का? HR सोबत पगार वाढवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आणि स्ट्रॅटेजी जाणून घ्या ज्यामुळे तुम्हाला चांगला पगार मिळू शकेल.

नोकरी मिळाल्यावर पगार वाढवण्याचे उत्तम मार्ग
कित्येक मुलाखतींनंतर जेव्हा नोकरी मिळते तेव्हा खूप आनंद होतो. पण त्याचबरोबर पगाराबाबत चर्चा कशी करावी हा प्रश्न पडतो. बरेच जण पगारावर बोलायला घाबरतात. त्यांना वाटतं जास्त पगार मागितला तर नोकरी हुकेल. पण HR ला माहिती असतं की उमेदवार पगार वाढवण्यासाठी चर्चा करेल आणि ते त्यासाठी तयार असतात. जाणून घ्या 5 सोप्या ट्रिक्स.
पगाराचा अंदाज घ्या
माहिती नसताना पगारावर बोलायचं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे. त्यामुळे तुमच्या कौशल्यानुसार सध्या किती पगार मिळतो ते Glassdoor, LinkedIn, AmbitionBox सारख्या वेबसाईटवरून पहा. कंपनीच्या पगार धोरणाबाबत माहिती घ्या. किमान किती पगार हवा ते ठरवा.
अपेक्षित पगार लगेच सांगू नका
HR ने अपेक्षित पगार विचारला तर लगेच कमी पगार सांगू नका. चांगलं उत्तर असू शकतं की, मला पगार इंडस्ट्री स्टँडर्ड आणि जबाबदाऱ्यांनुसार हवा आहे. तुम्ही या पदासाठी पगाराची रेंज सांगू शकाल का? मी या पदाच्या जबाबदाऱ्या आणि वाढीबाबत आधी जाणून घेऊ इच्छितो.
कौशल्य दाखवा
फक्त ३०% वाढ हवी हे सांगून चालणार नाही. कंपनीला तुमच्यापासून काय फायदा होईल ते दाखवावे लागेल. तुमच्या कामगिरीबद्दल सांगा, जसे की तुम्ही मागच्या नोकरीत विक्री १५% ने वाढवली. तुमची कोणती कौशल्ये कंपनीसाठी फायदेशीर असतील ते सांगा.
फक्त पगारावर लक्ष केंद्रित करू नका
कधीकधी कंपनीचा बजेट कमी असतो आणि ते तुम्हाला अपेक्षित पगार देऊ शकत नाहीत. अशावेळी इतर फायद्यांवर लक्ष केंद्रित करा जसे की जॉइनिंग बोनस, कामगिरी बोनस, कंपनीचे शेअर्स, रजा, घरून काम करण्याची सुविधा, आरोग्य विमा, प्रशिक्षण. हे सर्व तुमच्या एकूण उत्पन्नात आणि कामाच्या जीवनात समतोल राखण्यास मदत करू शकतात.
आत्मविश्वासाने बोला
तुमचा बोलण्याचा आणि शरीराचा आविर्भाव महत्त्वाचा असतो. नम्र पण ठाम राहा. चर्चेला भांडण न मानता तोडगा म्हणून पहा. HR ला जाणवायला हवं की तुम्ही कंपनी आणि नोकरीबाबत उत्सुक आहात, फक्त पैशासाठी नाही. बोलून झाल्यावर थोडा वेळ गप्प राहा. त्यामुळे समोरच्याला विचार करायला वेळ मिळतो. पगार निश्चित झाल्यावर अपडेटेड ऑफर लेटर मेलवरून घ्या. तोंडी कराराची काही किंमत नसते. योग्य तयारी, रिसर्च आणि आत्मविश्वासाने केलेली चर्चा तुमच्या करिअरमध्ये मोठा फरक आणू शकते.

