MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • 8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार? मेडिकल अलाउन्स थेट २० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता!

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार? मेडिकल अलाउन्स थेट २० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता!

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचारी संघटनांनी ८ व्या वेतन आयोगाकडे पेन्शनधारकांसाठी 'फिक्स्ड मेडिकल अलाउन्स' (FMA) १,००० वरून थेट २०,००० करण्याची मागणी केली आहे. यासोबतच फिटमेंट फॅक्टर आणि वार्षिक वेतनवाढ वाढवण्याचा प्रस्तावही दिला आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 03 2026, 05:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार?
Image Credit : Asianet News

केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार?

नवी दिल्ली : ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) अंमलबजावणीकडे डोळे लावून बसलेल्या १ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. वाढत्या महागाईच्या काळात आरोग्याचा खर्च पेलवणे कठीण होत असल्याने, कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 'फिक्स्ड मेडिकल अलाउन्स' (FMA) मध्ये भरघोस वाढ करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
१००० रुपयांवरून थेट २०,००० रुपयांची मागणी!
Image Credit : Gemini AI

१००० रुपयांवरून थेट २०,००० रुपयांची मागणी!

सध्या ज्या भागात सीजीएचएस (CGHS) सुविधा उपलब्ध नाहीत, अशा दुर्गम किंवा ग्रामीण भागातील पेन्शनधारकांना दरमहा केवळ १,००० रुपये फिक्स्ड मेडिकल अलाउन्स मिळतो. कर्मचारी युनियन आणि एनसी-जेसीएम (NC-JCM) गटाने ही रक्कम अपुरी असल्याचे सांगत ती २०,००० रुपये प्रति महिना करण्याची आग्रही मागणी केली आहे. 

Related Articles

Related image1
रेशन कार्डधारकांसाठी गुड न्यूज! १ एप्रिलपासून 'हा' नवा नियम लागू; आता देशात कुठेही मिळणार हक्काचं धान्य
Related image2
घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का? मोबाईलवर ५ मिनिटांत करा चेक; पहा सोपी पद्धत
36
८ व्या वेतन आयोगाच्या 'या' आहेत प्रमुख मागण्या
Image Credit : ChatGpt AI/Adobe stock

८ व्या वेतन आयोगाच्या 'या' आहेत प्रमुख मागण्या

कर्मचारी संघटनांनी सरकारला सादर केलेल्या प्रस्तावात केवळ मेडिकल अलाउन्सच नाही, तर इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

फिटमेंट फॅक्टर: सध्याचा फिटमेंट फॅक्टर वाढवून तो ३.२५ पट करावा.

वार्षिक वेतनवाढ: वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत नेण्यात यावा.

पेन्शनधारकांना दिलासा: खाजगी रुग्णालयांमधील महागडे उपचार लक्षात घेता पेन्शनधारकांसाठी वैद्यकीय मदतीत मोठी वाढ करावी. 

46
८ व्या वेतन आयोगाचे काम सुसाट
Image Credit : Gemini

८ व्या वेतन आयोगाचे काम सुसाट

८ व्या वेतन आयोगाच्या कामाला आता गती मिळाली असून, जस्टिस रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोग आपला अहवाल तयार करत आहे. दिल्लीतील 'चंद्रलोक बिल्डिंग'मध्ये आयोगाचे कार्यालय सुरू झाले असून, फेब्रुवारी अखेरीस ड्राफ्टिंग कमिटीची महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली आहे. आता कर्मचारी संघटना एक 'युनिफाइड मेमोरेंडम' (एकत्रित मागणीपत्र) तयार करत आहेत. 

56
या निर्णयाचा कोणाला फायदा होईल?
Image Credit : Getty

या निर्णयाचा कोणाला फायदा होईल?

जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर

ग्रामीण भागातील पेन्शनधारकांना: ज्यांना सरकारी रुग्णालये जवळ नाहीत, त्यांना खाजगी उपचार घेणे सोपे होईल.

आरोग्य विम्याचा ताण कमी: वाढीव अलाउन्समुळे किरकोळ औषधोपचाराचा खर्च खिशातून करावा लागणार नाही.

१ कोटी कुटुंबांना लाभ: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी अशा एकूण १ कोटी लोकांना याचा थेट फायदा मिळेल. 

66
महत्त्वाची टीप
Image Credit : our own

महत्त्वाची टीप

सध्या हा केवळ कर्मचारी संघटनांनी दिलेला प्रस्ताव आहे. ८ वा वेतन आयोग आणि केंद्र सरकार यावर अंतिम काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, ही मागणी मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या जीवनमानावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
डेली वेअरसाठी ६ सिल्क पायल करा खरेदी, आपण खरेदी करा हे डिझाईन
Recommended image2
Kitchen Tips: पहिल्यांदाच स्वयंपाक करताय? मग या किचन टिप्स नक्की लक्षात ठेवा
Recommended image3
Mobile Lost: 10 मिनिटांत करा 'या' 5 गोष्टी, नाहीतर बँक अकाऊंट होईल रिकामं!
Recommended image4
Kitchen Tips: कुकर छोटा असो वा मोठा, पाणी बाहेर येणार नाही! वापरा ही सोपी ट्रिक
Recommended image5
Kitchen Tips: तुम्ही मासे फ्रिजमध्ये स्टोअर करता? मग हे आधी नक्की वाचा
Related Stories
Recommended image1
रेशन कार्डधारकांसाठी गुड न्यूज! १ एप्रिलपासून 'हा' नवा नियम लागू; आता देशात कुठेही मिळणार हक्काचं धान्य
Recommended image2
घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का? मोबाईलवर ५ मिनिटांत करा चेक; पहा सोपी पद्धत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved