Blinkit ॲपमध्ये आले 'Parental Controls' फीचर!, लहानांसाठी आता अधिक सुरक्षित
Blinkit ने आपल्या अॅपमध्ये 'Parental Controls' हे नवे फीचर जोडले आहे. यामुळे पालक आता PIN वापरून वयोगटानुसार अयोग्य वस्तू लहान मुलांपासून लपवू शकतात आणि रिकव्हरी फोन नंबरची सुविधा देखील उपलब्ध आहे.

Blinkit या झपाट्याने वस्तू पोहोचवणाऱ्या लोकप्रिय ॲपमध्ये आता आणखी एक उपयुक्त सुविधा जोडण्यात आली आहे. Parental Controls! या नव्या फीचरमुळे आता तुमच्या कुटुंबातील लहानग्यांना वयोगटानुसार अयोग्य वस्तू दिसणार नाहीत. पालक आता आपल्या Blinkit प्रोफाइलमधून विशिष्ट संवेदनशील उत्पादने PINच्या मागे लपवू शकतात, आणि एका विश्वासार्ह रिकव्हरी फोन नंबरची नोंद देखील करू शकतात.
काय आहे ‘Parental Controls’ फीचरचं खास आकर्षण?
संवेदनशील वस्तूंना PIN चा संरक्षण – अॅपमध्ये अशा वस्तू लपवा ज्या लहान मुलांसाठी वयोगटानुसार योग्य नाहीत.
रिकव्हरी फोन नंबरची सोय – PIN विसरल्यास, तो सहजपणे पुनर्प्राप्त करता येतो.
मुलांसाठी सुरक्षित ब्राउझिंग अनुभव – घरातील लहान सदस्य Blinkit वापरू शकतात, तेही संपूर्ण नियंत्रणात.
Blinkit आता कुटुंबासाठी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर! Blinkit कडून हे एक सकारात्मक पाऊल आहे, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब लहानांपासून मोठ्यांपर्यंत अॅप सुरक्षितपणे आणि आनंदाने वापरू शकते.
तुम्हाला हे फीचर कसं वाटलं?
तुमचं मत महत्वाचं! तसेच Blinkit अॅप संपूर्ण कुटुंबासाठी आणखी उपयोगी कसा करता येईल यासाठी तुमचे सूचनाही स्वागतार्ह आहेत असं Blinkit ने म्हटलं आहे. तुमचं फीडबॅक आणि कल्पना आम्हाला Blinkit अॅपवर जरूर पाठवा.

