१३ लाखात कियाची लक्झरी कार घ्या विकत, बुकिंग कधी सुरु होणार?
किया इंडियाने कॅरेन्सचे नवीन व्हेरियंट बाजारात आणले आहे, जे आता इलेक्ट्रिक सनरूफसह उपलब्ध आहे. हे ७-सीटर मॉडेल पेट्रोल आणि डिझेल पर्यायांमध्ये उपलब्ध असून, यात ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण आणि सुधारित लायटिंगसारखी वैशिष्ट्ये आहेत.

१३ लाखात कियाची लक्झरी कार घ्या विकत, बुकिंग कधी सुरु होणार?
किया इंडियाने कॅरेन्स गाडी मार्केटमध्ये येणार आहे. या नवीन व्हेरियंटची किंमत G1.5 पेट्रोलसाठी ₹12,54,900 (एक्स-शोरूम),G1.5 टर्बो-पेट्रोलसाठी ₹13,41,900 आणि D1.5 डिझेलसाठी ₹14,52,900 ठेवण्यात आली आहे.
७ सीटर गाडी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध होणार
गाडी ७ सीटर मार्केटमध्ये आणली आहे. विद्यमान व्हेरियंतमध्ये उपलब्ध झाली असून अपग्रेड न करता फीचर्स असलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
सर्वात खास काय आहे गोष्ट?
सर्वात खास अशी गोष्ट आहे की स्काय लाईट इलेक्ट्रिक सनरूफ, जे G1.5 पेट्रोल व्हर्जनवर उपलब्ध आहे. या पॉवरट्रेनसह सनरूफ देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आराम आणि सुविधा काय?
सनरूफसोबत या गाडीमध्ये अनेक फॅसिलिटी देण्यात आल्या आहेत. या गाडीमध्ये ऑटोमॅटिक तापमान कंट्रोल सिस्टीम देण्यात आलं आहे. या गाडीमध्ये केबिनच्या आराम देण्यात आला आहे.
ड्रायव्हर-साइड पॉवर विंडोमध्ये ऑटो अप/डाउन फंक्शन देखील आहे
एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प आणि एलईडी पोझिशन लॅम्पसह बाह्य प्रकाशयोजना सुधारली आहे, ज्यामुळे उच्च व्हेरिएंटच्या लायटिंग समतुल्य होतात. यामध्ये ड्रायव्हर-साइड पॉवर विंडोमध्ये ऑटो अप/डाउन फंक्शन देखील आहे
या किमतीत काय काय मिळणार?
या किमतीत सनरूफ आणि ऑटोमॅटिक किआ पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये कॅरेन्स क्लॅव्हिसची किंमत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते, तसेच तीन-रो एमपीव्ही विभागात किंमत स्पर्धात्मक ठेवते.

